ज्याचे ध्यान कधी नव्हते होत भंग ते शिवशंकर का पीत होते भांग..

नागेन्द्र हाराय त्रिलोचनाय भस्माङगरागाय महेश्र्वराय
नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मै नकाराय नमः शिवाय

या जगास चालविणारा विष्णू आहे तर या जगातील सर्व गोष्टी बैलेंस राहतात शिव शंकरामुळेच, शिव तो आहे जो कठीण गोष्टीत असतो शिव तो आहे विषास अमृत म्हणून पितो. तो निष्कपट आहे तो चिंतेत चिंतन करतो म्हणून तो भोलेनाथ आहे. जगात जेवढे शिवभक्त आहे तेवढे शंकराचे नाव घेऊन भांग पितात. काही लोक हा निष्कर्ष लावतात कि शिव शंकर भांग पीत होते म्हणून आपण हि भांग पियाला हवी आज खासरे वर बघूया या गोष्टी मागील कारण..

भांग जुन्या काळापासून वापरल्या जाते तिला अमृताची उपाधी दिलेली आहे. भांग पासून अनेक आजारावर इलाज शक्य आहे गंभीर जखमा देखील भांग मुळे भरून निघतात. वेदात पाच पवित्र रोपट्या पैकी एक रोपट भांगचे आहे. एक म्हण आहे ज्या प्रमाणे सूर्य बिना दुषित होतात मूत्रातील सर्व पाणी आपल्या अंदर ओढून घेतो त्या प्रमाणे भगवान शंकर न थांबता विषाचा समुद्र पूर्ण आपल्या मध्ये सामावून घेतात. ते एवढे शक्तिशाली आहे कि भांग अथवा चिलम ओढून देखील आपले संतुलन बिघडू देत नाही.

कोणी अघोरी शिव शंकराप्रमाणे योगी होण्यास ध्यान केंद्रित करण्यात चिलम पितो परंतु तो योगी होऊ शकत नाही कारण शिव शंकर हे परमयोगी आहेत. आता बघूया भांग व शंकर भगवान यांचा संबध काय ?

समुद्र मंथन समुद्र मंथनातून जेव्हा विष निघाले तेव्हा देवता आणि राक्षात हाहाकार माजला शंकरांनी ते विष प्रश्न केले परंतु ते विष त्यांनी कंठात ठेवले त्यामुळे त्यांना निळकंठ म्हणतात. ह्या विषाची दाहकता कमी करण्या करिता महादेव कैलाश पर्वतावर गेले तिथे तापमान शून्य असते सोबतच महादेवाची पूजा करताना बेल वाहता कारण बेल थंड आहे. आणि भांग देखील वैज्ञानिक दृष्टीकोनातून बघितल्यास थंड आहे.

वेद वेदा नुसार समुद्र मन्थनाच्या वेळेस एक थेंब मदिरेचा पृथ्वीवर पडला त्यामुळे एक झाड उगविले त्या झाडाचे रस सर्व देवता पिऊ लागले. हेच झाड महादेव कैलास पर्वतात घेऊन गेले आणि सर्वाना हा रस उपलब्ध करून दिला.

गंगाची बहीण भांग हि गंगाची बहीण आहे कारण भांग नेहमी गंगा काठावर उगविते त्यामुळे शंकराच्या जटेत गंगा शेजारी भांगेस जागा दिलेली आहे.

ह्या सर्व दंतकथा आहे. परंतु शिवजीच्या चरित्रातील भांग एक गोष्ट आहे त्यापेक्षा त्यांच्या चरित्रातून काही शिकायला हवे… आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *