राजीव-सोनिया गांधींच्या लग्नानंतर ४ महिन्यांतच जन्मले राहुल गांधी? वाचा व्हायरल पोस्टमागचे सत्य..

सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दावा केला जात आहे कि राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्या विवाहानंतर ४ महिन्यातच राहुल गांधी यांच जन्म झाला होता. पण यामध्ये खरंच काही तथ्य आहे का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. खासरेवर जाणून घेऊया व्हायरल पोस्टमागचे सत्य..

काय आहे व्हायरल पोस्टमध्ये?

व्हायरल पोस्टवर सोनिया आणि राजीव गांधी यांचे २५ फेब्रवारी १९६८ ला लग्न झाले. त्यानंतर अवघ्या ४ महिन्यात म्हणजेच १३ जून १९६८ ला राहूल गांधी यांचा जन्म झाला. अशा स्वरूपाचा मेसेज बीजेपी सपोर्टर्स कडून मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. काही मोदी यांच्या नावाने असलेल्या पेजेस वर सुद्धा अशी पोस्ट करण्यात आली आहे.

काय आहे सत्यता-

सोनिया आणि राजीव गांधी यांचे लग्न २५ फेब्रवारी १९६८ ला झाले हे खरे आहे. दोघांची ओळख हि १९५६ ला झाली होती. सोनिया या तेव्हा केम्ब्रिज मध्ये शिक्षण घेत होत्या. तिथेच या दोघांची ओळख झाली आणि ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. पुढे दोन्ही कुटुंबाच्या संमतीने त्यांचे लग्न झाले.

वायरल मेसेज मध्ये दिलेली लग्नाची तारीख खरी आहे. पण दोघांना पहिलं मूल झालं १९ जून १९७० ला. १९ जून १९७० ला राहुल गांधींचा जन्म झाला. राहुलच्या जन्मानंतर २ वर्षांनी १२ जानेवारी १९७२ ला प्रियांका गांधी यांचा जन्म झाला. यावरून हे सिद्ध होते कि वायरल पोस्टमध्ये कुठलंही सत्य नाहीये.

पण या वायरल पोस्टवरून राजकारणात टीका करण्याचा दर्जा किती ढासळत आहे हे आपल्या लक्षात येते. वायरल पोस्टमधून सोनिया गांधी या लग्नापूर्वीच प्रेग्नेंट होत्या असं दाखवायचा प्रयत्न केला आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *