काय आहे #Metoo चळवळ आणि कशी झाली याची सुरवात नक्की वाचा

भारतात सध्या सगळीकडे metoo हा विषय गाजत आहे. राजकारणी, अभिनेता, पत्रकार सर्व क्षेत्रातील लोक पुढे येत आहेत आणि त्यांच्या सोबत झालेला अत्याचार ते बोलवून दाखवत आहेत. परंतु मुळात metoo हि चळवळ काय आहे हे अनेकांना माहितच नाही. अलोक नाथ आणि नाना पाटेकर यांच्यावर आरोप झाल्यामुळे हि चळवळ अजून प्रकाशझोतात आली.

हि चळवळ २००६ साली सुरु झाली आहे आणि या चळवळीची सुरवात तराना बुरके Tarana Burke या महिलेनी केली आहे. वर्णद्वेष परकीय देशात जास्त प्रमाणात केला जातो त्यामध्ये त्यांना आलेले कटू अनुभव मांडण्याकरिता हि चळवळ सुरु करण्यात आली होती. तराना ह्या ४५ वर्षीय न्यूयॉर्क येथील एक सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या मानव अधिकार कार्यकर्त्या आहे. 2017 साली त्यांना टाईम पर्सन ऑफ द यर हा पुरस्कार देखील मिळालेला आहे.

तर #metoo ची सुरवात कशी झाली हे बघूया २००३ साली “My Space” नामक NGO मध्ये तराना काम करत होत्या. त्या काळात त्यांना एक मुलगी मिळाली तिने तिच्या सोबत झालेली घटना ऐकून या चळवळीस सुरवात केली. त्या मुलीसोबत तिच्या आईचा मित्र हा शारीरिक संबध ठेवत होता आणि तिला सांगितल्यास मारण्याची धमकी देत होता. तिला काही कळत नव्हते तेव्हा तिने ५०० फोलोवर असलेल्या twitter खात्यावर जर आपल्या कोणी अत्याचार केला असेल तर #Metoo म्हणून tweet करा असा मेसेज पाठविला.

१२ वर्षा अगोदर सुरु झालेली हि चळवळ मागील २ वर्षापासून जोर पकडत आहे. अनेक हॉलीवूड सिनेस्टार या चळवळीला सपोर्ट करत आहेत. #Metoo मध्ये वर्णद्वेष , शिवीगाळ इत्यादी गोष्टीही येतात परंतु भारतात ती फक्त एका विशिष्ट विषयात मर्यादित राहिलेली आहे. आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *