भाजीपाला विकणारा सामान्य घरातील तरुण ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ! वाचा छगन भुजबळ यांचा जीवनप्रवास..

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा आज वाढदिवस. छगन भुजबळ यांनी त्यांच्या जीवनात अनेक चढ-उतार बघितले आहेत. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी ते बराच काळ तुरुंगात होते. खासरेवर जाणून घेऊया छगन भुजबळ यांचा संपुर्ण जीवनप्रवास

50 च्या दशकात स्टेजवर जाऊन एकपात्री नाटकात एकदम दमदार अभिनय करून एका सामान्य घरातील तरुणाने सर्वांची कौतुकाची थाप मिकवली. आणि तो विजेताही बनला. ते तरुण होते छगन भुजबळ, वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजीकल इन्स्टिट्यूट कॉलेज मुंबईचे विद्यार्थी. आणि याच स्पर्धेत उपविजेते होते शोले फेम अमजद खान. याच तरुणाने पुढे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत प्रवास केला…

नाशिकमधील भगवानपुराच्या छोट्याश्या गल्ली बोळात छगन भुजबळ यांचे बालपण गेले. वडिलांच्या अकाली निधनाने त्यांचे कुटूंबीय मुंबईला स्थलांतरित झाले. मुंबईत गेल्यानंतर त्यांनी भायखळ्याच्या अंजुरवाडी चाळीत राहण्यास सुरुवात केली. तिथे छगन आणि त्यांचे भाऊ मगन यांनी भाजीपाला देखील विकला. तर दिवस त्यांच्यासाठी खूप हलाखीचे होते. त्यांच्या काकू जानकीबाई देखील त्यांच्यासोबत राहण्याच्या. पुढे जानकीबाई आणि हे दोघे भाऊ त्यांच्या माझगाव मधील घराच्या समोर भाजीपाला विकायला लागले. त्यांनी थोड्याच दिवसात भायखळा भाजीमार्केट मध्ये 35 स्क्वेअर फूट जागा भाजीपाला विक्रीसाठी घेतली.

त्यांच्या भावासोबतच्या या प्रेमामुळेच त्यांनी पूढे समीरला मोठ्या संधी दिल्या. समीर हा मगन यांचा मुलगा. मगन भुजबळ यांचे 80 च्या दशकात निधन झाल्यानंतर छगन यांनीच त्यांचा सांभाळ केला. समीर सुद्धा सध्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी इडीच्या ताब्यात आहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदनच्या बांधकामात झालेल्या घोटाळ्यामुळे भुजबळ कुटुंबाची चौकशी सुरू आहे.

एकेकाळी भाजीपाला विकणारे छगन भुजबळ हे पूढे नाशिकमधील सर्वात ताकदवान नेता बनले.छगन भुजबळ यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात शिवेनेकडून मुंबई महापालिकेत 1973 साली नगरसेवक बनण्यापासून झाली. 1973 मध्ये ते मुंबई महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेले आणि 2 वर्षातच विरोधी पक्षनेते बनले. त्यांनी 1973 ते 1984 असे तब्बल 11 वर्षे विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहिले. 1985 सालीचा त्यांच्या खांद्यावर मुंबई महापालिकेच्या महापौर पदाची मोठी जबाबदारी आली.

1989 मध्ये त्यांनी मुंबई एज्युकेशनल ट्रस्टची (मेट) स्थापना केली. मेटचे शाळा कॉलेजेस संपूर्ण महाराष्ट्रात नावारूपाला आलेले आहेत. नाशिकला भुजबळ यांनी एज्युकेशनल हब बनवून टाकले आहे.

1991 साली बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत मतभेद झाल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पुढे 1999 मध्ये त्यांनी काँग्रेसमधूनही बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. छगन भुजबळ हे राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आणि संस्थापाक सदस्यांपैकी एक आहेत. 1985 आणि 1990 साली ते दोनवेळा माझगाव विधानसभा मतदारसंघातुन आमदार बनले. छगन भुजबळ यांनी महसूलमंत्री, गृहनिर्माण आणि झोपडपट्टी सुधारणा खाते, विधान सभेचे विरोधी पक्षनेते ग्रह आणि पर्यटन तसेच दोनवेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असे महत्वाचे पदे सांभाळली आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *