दुधाने अंघोळ करून त्याची खीर भक्तांना वाटणाऱ्या बाबा रामपालविषयी काही माहिती नसलेल्या गोष्टी..

बरवाला येथील सतलोक आश्रमाचे संचालक बाबा रामपालला हिसारच्या न्यायालयाने हत्येच्या आरोपात दोषी घोषित केले आहे. बाबा रामपालला २ महिला आणि १ मुलाच्या हत्येच्या आरोपात दोषी ठरवले आहे. १७ ऑक्टोबरला रामपालच्या शिक्षेवर सुनावणी होणार आहे.

दुधाने अंघोळ करून त्याची खीर भक्तांना वाटणारा बाबा रामपाल आहे तरी कोण?

रामपाल बाबाला अटक होण्याआधी तो एक खूप मोठा महान कबीरपंथी संत म्हणून ओळखला जायचा. पण जेव्हा त्याला हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली त्यानंतर त्याचे काळे कारनामे बाहेर यायला सुरु झाले. त्याच्या भक्तांना कल्पनाही नसेल एवढे धक्कादायक सत्य समोर आले.

काय होते प्रकरण?

२००६ मध्ये बाबा रामपालने आर्य समाजातील सत्यार्थ प्रकाश या पुस्तकावर आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर आर्य समाजातील अनुयायांनी १२ जुलै २००६ ला बाबाच्या आश्रमावर हल्ला केला. या हिंसेत ५९ लोक जखमी झाले तर एकाच मृत्यू झाला. यामध्ये बाबा रामपालला २२ महिने जेलमध्ये राहावे लागले. त्यानंतर बाबाला २००८ मध्ये जमानत मिळाली. पण नंतरच्या २२ सुनावणीला बोलवून पण हजर न झाल्याने नोव्हेंबरमध्ये अजामीनपात्र अटक वॉरंट बजावला. त्यांनतर पोलीस त्याला अटक करण्यासाठी गेले असता बाबाच्या भक्तांमध्ये आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला. यात ५ महिलांचा आणि १ मुलाचा मृत्यू झाला. त्यांनतर बाबावर हत्येसह अनेक गंभीर गुन्हे दाखल झाले होते.

बाबाच्या आश्रमातील धक्कादायक रहस्य-

महिलांच्या बाथरूमवर सीसीटीव्हीने नजर

आश्रमामध्ये असंख्य कॅमेरे लावलेले होते. पण धक्कादायक बाब म्हणजे बाबा महिलांच्या बाथरूमवर सीसीटीव्हीने नजर ठेवायचा. या सीसीटीव्हीचं रेकॉर्डिंग बाबाच्या परवानगी शिवाय कोणीही जाऊ शकणार नाही अशा रेस्ट रूममध्ये होते.

दुधाने अंघोळ करून भक्तांना प्रसाद म्हणून त्याची खीर

रामपाल बाबाला अटक झाल्यानंतर त्याचे अनेक रहस्य समोर आले. त्यापैकी एक म्हणजे बाबा रामपाल हा दुधाने अंघोळ करत असायचा. आणि त्या दुधाची खीर बनवून भक्तांना प्रसाद म्हणून वाटायचा. ४ एकरवरच्या आश्रमात २० गायी होत्या. त्यांच्या दुधापासून बाबा अंघोळ करायचा.

बाबाची खास बेडरूम-

बाबाच्या आश्रमात एक आलिशान बेडरूम देखील होती. एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलपेक्षा कमी सुविधा या रूममध्ये नव्हत्या. बाबाच्या बेडरुममध्ये गुप्त लिफ्ट देखील होती. बाबा इथूनच आपल्या ब्लॅक कमांडोना सूचना द्यायचा.

रामपाल बाबाचे बुलेटप्रूफ सिंहासन-

रामपाल बाबा १२ फूट उंच बुलेटप्रूफ सिंहासनावर बसायचा आणि प्रवचन द्यायचा. येथून बाबाच्या केबिनमध्ये जाण्यासाठी हायड्रॉलिक लिफ्ट देखील लावण्यात आलेली होती.

रामपालच्या तळघराचे रहस्य-

बाबाच्या प्रत्येक आश्रमात तळघर असायचे. जिथे तो मोजक्या भक्तांच्या समोर प्रकट व्हायचा. बाबाला अटक झाल्यानंतर त्याचे सर्व रहस्य बाहेर आले.

बाबाच्या कामांची हार्डडिस्क-

पोलिसांनी अटक केल्यानंतर अनेक गोष्टी पोलिसांनी जप्त केल्या. यामध्ये १ लॅपटॉप, १० हार्डडिस्क आणि १७ सीडी सापडल्या होत्या.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *