पहिला हिंदू डॉन मन्या सुर्वे आणि नाना पाटेकर यांच्यात काय नाते आहे?

नाना पाटेकर यांच्याबद्दलची ही माहिती आज पर्यंत बऱ्याच जणांना माहिती नाही आहे.नाना पाटेकर यांचा गुन्हेगारी जगताशी काय संबंध आहे? तर चला पाहूया खासरेवर आपण काय संबंध आहे त्यांचा मन्या सुर्वेशी..

नाना यांचे खरे नाव विश्वनाथ पाटेकर असे आहे. त्यांचे वडील दिनकर पाटेकर चित्रकार होते. मुंबईतील जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स येथून नानांनी आपले शिक्षण पूर्ण केले. कॉलेज जीवनात त्यांनी रंगभूमीवर काम केले. नानांना स्केचिंगची आवड आहे. गुन्हेगारांची ओळख पटवून देण्यासाठी नाना मुंबई पोलिसांना स्केच बनवून देत असे. नाना यांचे लग्न नीलकांती पाटेकर यांच्यासोबत लग्न झाले. त्यांना एक मुलगा असून मल्हार पाटेकर हे त्याचे नाव आहे.

अभिनेते नाना पाटेकर यांच्‍या आईचे माहेरचे आडनाव सुर्वे. रमण सुर्वे हा त्‍यांचा सख्खा धाकटा मामा. मुंबईतील कुख्‍यात गुंड मन्या सुर्वे हा त्‍यांचा मामेभाऊ. नानांवर त्याचे सावट पडू नये म्हणून लहानपणीच त्‍यांच्‍या आईने त्‍यांना मुंबईतून मुरूड-जंजिर्‍यास राहण्यास नेले. नानांचे बालपण अत्‍यंत प्रतिकुल परिस्थितीत गेले. त्‍यांचे वडील मुंबईला होते आणि नाना शिकायला गावाला. याला कारणही तसेच होते. त्‍यांची सख्‍खे भाऊ भार्गव आणि मन्‍या ही दोघे मुंबईतील कुख्‍यात डॉन. त्‍यामुळे ओघानेच नानांचाही त्‍यांच्‍यासोबत संपर्क यायचा. त्‍यामुळे नानाही त्‍यांच्‍या नांदी लागेल, ही भीती त्‍यांच्‍या आईला कायम होती. त्‍यातूनच त्‍यांच्‍या आईने त्‍यांना मुरूड जंजिऱ्याला शिकायला नेले. खालील विडीओमध्ये बघा मन्या सुर्वेचा पूर्ण जीवनपट

मन्या कसा झाला गँगस्टार ?

मनोहर ऊर्फ मन्‍या सुर्वे हा मुंबईतील कुप्रसिद्ध डॉन होता. त्‍याच्‍या आयुष्‍यावर ‘शुट आऊट अॅट वडाळा’ हा हिंदी चित्रपटही आला. मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्‍याचा जन्‍म झाला. कीर्ती कॉलेजमधून त्याने बीए केले. मात्र, आपला सावत्र भाऊ भार्गवमुळे तो गुन्‍हेगारी जगतात आला. त्‍याने त्याच्या कॉलेजमधील मित्रांनाही गँगमध्ये सामिल करून घेतले. भार्गवची मुंबईतील दादरमध्ये मोठी दहशत होती.

अवती भोवती गुन्‍हेगारी पार्श्‍वभूमी असताना नाना मात्र संस्‍कारी झाले. त्‍यांना साधी चोरीही करावीशी वाटली नाही. ते केवळ त्‍यांच्‍या आईच्‍या संस्‍कारामुळेच नाना पाटेकर यांनी आत्तापर्यंत चार वेळा फिल्मफेअर पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली आहे. याशिवाय तीनदा त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. ‘परिंदा’, ‘क्रांतीवीर’ आणि ‘अग्निसाक्षी’ या सिनेमातील भूमिकांसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. 2013 मध्ये भारत सरकारने पद्मश्री देऊन त्यांचा गौरव केला.

माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *