पाकिस्तानमधील या ठिकाणी आहे देवीचे मुख्य शक्तीपीठ..असा साजरा होतो याठिकाणी नवरात्र उत्सव

भारतात सध्या सर्वत्र नवरात्र उत्सव मोठ्या धुमधडाक्यात सुरु आहे. वेगवेगळ्या देवींच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. तसेच सध्या मातृशक्ती आदिशक्ती चा सर्वजण जागर करत आहेत. आम्ही आपल्याकरिता घेऊन आलो आहोत पाकिस्तान मधील एका नवरात्र उत्सवाची माहिती घेऊन.

पाकिस्तान म्हटले कि आपल्या डोक्यात येते एक मुस्लिम देश ज्यात हिंदुत्वाला प्रखर विरोध पण या पाकिस्तान मध्ये एक नवरात्र उत्सव आहे कि ज्याला स्वतः मुस्लिम समाज हजर असतो. हिंदू धर्मग्रंथाच्या मान्यताप्रमाणे देवीचे एकूण ५१ शक्तिपीठे आहेत त्यापैकी काही शक्तीपीठ हे पाकिस्तान मध्ये आहेत. ५१ शक्तिपीठातील पहिले शक्तीपीठ म्हणून ज्याच्याकडे पहिले जाते ते आहे. हिंगलाज शक्‍तिपीठ या ठिकाणी देवी चे शीर या ठिकाणी पडले होते म्हणून या शक्तिपीठाला हिंदू धर्मात प्रचंड महत्व आहे.

हिंगलाज हे स्थळ कराची पासून १२५ किमी वर पाकव्याप्त बलुचिस्थान येथे आहे. हे ठिकाण हिंगोल नदी शेजारी व चंद्रकुंप पर्वतावर हे मंदिर अत्यंत नयनरम्य ठिकाणी २००० वर्षांपासून एका भव्य गुफेत स्थापित आहे. या ठिकाणची देखरेख मुस्लिम धर्मीय लोक करत असतात. नवरात्र मध्ये याठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात. कराची सिंध मधून लाखो भाविक याठिकाणी नवरात्र मध्ये येतात. भारतामधून हि एक मोठा भाविकांचा जथा याठिकाणी जातो.

याठिकाणी स्वतः प्रभू रामचंद्र यांनी भेट देऊन हिंगलाज देवीचे दर्शन घेतल्याचे पुराणातील उल्लेखावरून दिसून येते आहे. हिंगलाज देवीच्या गुफेजवळ जमदग्नी ऋषीने घोर तपश्चार्या केली होती. महान संतांनी हि या देवीचे दर्शन घेतल्याची नोंद उपलब्ध आहे. गुरु गोरखनाथ, गुरु नानक, दादा मखान यासारख्यानी दर्शन घेतले आहे.

याठिकाणाबद्दल अशी धारणा आहे कि देवीचे शीर येथे असल्याकारणाने येथे चारधाम व काशी ला जाऊन जेवढे पुण्य मिळते ते पुण्य एकट्या हिंगलाज देवीच्या दर्शनाने मिळते. त्यामुळे पाकिस्तानी हिंदू याठिकाणी मोठ्या संख्येने येतात. याठिकाणी बलुचिस्थान मधील मुस्लिम सुद्धा मोठ्या संख्येने येतात कारण ते नानी का पीर म्हणून याठिकाणी लाल शाल मेणबत्ती अगरबत्ती अर्पित करतात.

यादेवीस्थानावर अनेक आक्रमकांनी हल्ले करून पाहिले पण हिंदू मुस्लिम एकत्र येऊन त्यांनी आक्रमकांना देवीचे मंदिर उद्ध्वस्त करू दिले नाही. तसेच भारत पाकिस्तान फाळणी वेळी काही दहशतवाद्यांनी या मंदिराला बॉम्ब ने उडवण्याचा प्रयत्न केला तर त्याच दहशतवाद्यांना हानी ला सामोरे जावे लागले.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *