निर्मनुष्य असणाऱ्या ठिकाणी रात्री १ ला मुंबई बेस्ट बस चालक वाहकांकडून या तरुणीला असा आला अनुभव जो वाचून अभिमान वाटेल

एकटी मुलगी निर्जन ठिकाणी असेल तर तिच्या कडे कामवासना भागवायची संधी म्हणून पाहिल्या जाते असे आपण अनेक वेळा पाहिले पण मुंबई मध्ये असा काही प्रकार घडला कि तो वाचून आपल्याला अभिमान वाटेल. मुंबई ने अनेक वेळा माणुसकीचे दर्शन घडवले आहे. सध्या मंताशा शेख ला एक अनुभव आला तिने तो अनुभव ट्विटर वर शेअर केला आहे.

मंताशा शेख हि ४ ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा बसने घरी निघाली होती तेव्हा तिला बस प्रवासाच्या दरम्यान आलेला अनुभव तिने ट्विटरच्या माध्यमातून लोकांना सांगितला त्या तिच्या ट्विट ला जवळ जवळ ३ हजाराहून अधिक रिट्विट आणि ८ हजाराहून अधिक शेअर आल्या.

मंताशा हिने ट्विटर वर लिहिले आहे कि मला बेस्टच्या ३९८ बसच्या वाहक आणि चालकांचे आभार मानायचे आहेत कि त्यांनी रात्री दीड वाजता मी माझ्या निर्मनुष्य असणाऱ्या बेस्ट बस थांब्यावर उतरले तेव्हा त्यांनी विचारले कि आपल्याला घरून कोणी घ्यायला येणार आहे का मी त्यांना नाही बोलले तेव्हा त्यांनी बस बाजूला पार्क करून मी रिक्षाने घरी जाई पर्यंत थांबले. या प्रकाराने मी मुंबईवर भारावून गेले आहे. आम्ही मुंबईकर लिहून तिने आपले आभार व्यक्त केले.

मंतशा हि ज्या बसने जात होती त्या बसचे चालक वाहक प्रशांत मयेकर व राज दिनकर हे दोघे होते. साकीनाका वरून मंताशा हि नातेवाइकांच्याकडून आपल्या आरे कॉलनी मधील घरी निघाली होती.तेव्हा हा माणुसकी दाखवणारा अनुभव तिला आला. या बसच्या चालक व वाहकां सोबत टाइम्स ऑफ इंडियाच्या प्रतिनिधीने बोलणे केले तेव्हा दोघांनी सांगितले कि आम्ही आमचे कर्तव्य पूर्ण केले आहे. आम्हाला आमच्या प्रशिक्षणादरम्यान शिकवण्यात आले होते कि महिला आणि वृद्ध यांची काळजी घ्यावी. आम्ही तेच त्या दिवशी केले.

मंताशा शेखच्या ट्विट मुळे अनेकांनी मुंबई बेस्ट बसचे चालक वाहक प्रशांत मयेकर व राज दिनकर यांचे अभिनंदन केले त्यांचे सर्वजण कौतुक करत आहेत. एकूणच मुंबईमध्ये प्रत्येकजण इतरांकडे आपली मुंबईकर याच भावनेतून पाहत असते. खासरे कडून वाहक आणि चालक यांचे अभिनंदन !!

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *