बॉईज 2 चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, पहिल्या आठवड्यात कमावले एवढे कोटी रुपये..

सध्या बॉक्स ऑफिस वर एक मराठी चित्रपट प्रचंड धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट म्हणजे बॉईज २ . तीन शालेय मित्रांचे विश्व मांडणारा ‘बॉईज’ हा मराठी चित्रपट 2017 साली रसिकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटातील ‘आम्ही लग्नाळू गाणं…’ व चित्रपट अक्षरशः रसिक प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला. त्यानंतर निर्मात्यांनी या सिनेमाचा सीक्वल बॉईज २ हा काढला. सध्या चित्रपट गृहात या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. ३ दिवसात चित्रपटाने प्रचंड गल्ला जमवला आहे.

बॉईज चित्रपटातून शालेय जीवन दाखवून लोकांचे मनोरंजन केल्यानंतर बॉईज २ या सिक्वल मध्ये महाविद्यालयीन तरुणांचे भावविश्व दाखवण्यात आले आहे. प्रेम आणि रोमान्स चित्रपटात पाहायला मिळाला तरी आपापसांतील वैर, गटपद्धती आणि त्यांच्यातील वादविवाद देखील पाहायला मिळतो आहे. आजकालची तरुणाई मोबाईलच्या किती आहारी गेली आहे हे सुद्धा या सिनेमातून दाखवण्यात आले आहे. टेक्नॉलॉजीचा जसा फायदा आहे त्याच प्रमाणे तोटा देखील आहे. मोबाईलच्या अतिवापराने तरुणाई भरकटू शकते. या सिनेमातून एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. चित्रपटात असलेले डायलॉग्स प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. त्यामुळे बॉईज २ ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाने एकून ५. ११ कोटी चा गल्ला जमवला आहे. हा मराठी चित्रपट इंडस्ट्री मधील एक माईलस्टोन आहे.

‘बॉईज 2’ या चित्रपटात पार्थ भालेराव, सुमंत शिंदे, प्रतीक लाड, जयंत वाडकर, गिरीश कुलकर्णी, सायली पाटील यांनी या चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. विशाल देवरुखकर यांनी दिग्दर्शन केले असून लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया निर्माते आहेत. ॠषिकेश कोळी कथा, पटकथा व संवाद लेखन तर जटला सिद्धार्थ यांनी छायादिग्दर्शक म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. अवधुत गुप्तेच्या संगीताने चित्रपटात रंगत आणली आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *