डॉक्टरांचे हस्ताक्षर घाण का असते, जाणून घ्या यामागचं कारण…

आपल्या जीवनात अनेकवेळा डॉक्टरकडे जाण्याचा प्रसंग येतो. डॉक्टरकडे आपण तपासणी करतो त्यानंतर डॉक्टर जेव्हा औषधी लिहुन देतो तेव्हा मात्र आपल्यासमोर एक प्रश्नचिन्ह उभा राहते. ते म्हणजे डॉक्टरांच्या हस्ताक्षरावरून. कारण डॉक्टर ज्या हस्ताक्षरात लिहितात ते आपल्या डोक्यावरून जाते. डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन लिहिल्यानंतर प्रत्येक वेळी आपल्याला प्रश्न पडतो की डॉक्टर एवढे शिकलेले असताना घाण हस्ताक्षरात प्रिस्क्रिप्शन का लिहितात. जर तुम्हाला पण प्रत्येक वेळी हा प्रश्न पडत असेल तर आज आपण यामागचं कारण जाणून घेऊया.

सामान्य व्यक्तीसाठी डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन वाचता येने खूप कठीण काम असते. ते फक्त केमिस्ट वाले आणि मेडिकल क्षेत्रातील व्यक्ती समजू शकतो. महत्वाचे म्हणजे मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया कडून सर्व डॉक्टरांना पेशंटला कळेल अशा हस्ताक्षरात प्रिस्क्रिप्शन लिहिण्याच्या सूचना दिल्या आहेत आणि ते पेशंटना व्यवस्थित समजून सांगण्यास सांगितलेले आहे. कोणतं औषध कोणत्या आजाराचं आहे आणि त्याच नाव काय आहे. पण बऱ्यापैकी डॉक्टर हे करत नाहीत आणि त्यांचे प्रिस्क्रिप्शन पेशंटसाठी कोडे बनून जाते.

कोड बनलेल्या या हस्ताक्षरामागचे कारणही जाणून घेऊया. खरंतर नुकतेच एका महिला डॉक्टरला याविषयीची विचारले असता तिने उत्तर दिले की डॉक्टर बनायच्या अगोदर मेडिकलचे स्टुडंट खूप मेहनत करतात. कारण त्यांना कमी वेळात मोठ्या परीक्षांसाठी तयारी करायची असते. यामुळे त्यांना घाईघाईत लिहायची सवय होऊन जाते. खूप घाईघाईने लिहिल्याने त्यांचे हस्ताक्षर घाण बनते. मग ते सामान्य माणसाला समजत नाही.

यासोबतच दुसरा प्रश्न हा पडतो की मेडिकल अमी केमिस्ट वाले कसं काय डॉक्टरांचं हस्ताक्षर ओळखतात. याच कारण म्हणजे जास्तीत जास्त डॉक्टर हे घाईत लिहिन्यासाठी काही कोड वापरतात. मेडिकल भाषेत असणाऱ्या या कोडला मेडिकल क्षेत्रातील कोणीही व्यक्ती ओळखू शकतो. केमिस्टवाल्याना सवय बनते की कोणत्या गोळ्या-औषधीचे काय नाव आहे आणि तिला कसे लिहिले जाते. यामुळेच केमिस्टला प्रिस्क्रिप्शन दाखवलं की पटकन तो नाव वाचून दाखवतो.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *