सुप्रसिद्ध जुनिअर मोदी यांच्या सोबत घडत आहेत असे वाईट प्रसंग जे वाचून धक्का बसेल.

देशातील सर्वात लोकप्रिय व्यक्तिमत्व म्हणून माननीय नरेंद्र मोदींच्याकडे पाहिले जाते त्यांच्या प्रसिद्धीमुळे २०१४ मध्ये प्रचंड बहुमत घेऊन ते सत्तेवर आले. २०१४ साली एक मोदी सारखी दिसणारी व्यक्ती अभिनंदन पाठक यांचा चेहरा मोदी सारखा मिळता जुळता आहे. त्यांना तेव्हा ज्युनिअर मोदी म्हणून सर्वजण ओळखायला लागले. देशभरात अनेक ठिकाणी ते प्रचाराला हि गेले. अभिनंदन पाठक हे युपी मधील सहारनपूर येथील आहेत. त्यांच्या भागात हि त्यांना मोदींच्या सारखे दिसतो म्हणून प्रचंड प्रेम मिळाले.

सध्या नरेंद्र मोदी यांच्या सारखे दिसणे अभिनंदन पाठक यांना त्रासदायक ठरत आहे. त्याबाबत त्यांनी स्वतः ANI या न्यूज संस्थेला बोलताना सांगितले कि आता जेव्हा ते बाहेर फिरतात. तेव्हा सामान्य लोक त्यांना पकडून अच्छे दिन कधी येणार असा प्रश्न करून मारहाण करत आहेत. काहीच दिवसापूर्वी अभिनंदन याना एक भयंकर अनुभव आला. ते जेव्हा युपी मध्ये भाजपच्या तेथील स्थानिक निवडणुकीचा प्रचार करण्यास गेले तेव्हा सामान्य जनतेने त्यांना पकडून जाब विचारला कि तुम्ही मोदींचा प्रचार केला अच्छे दिन येतील असे म्हणाले होते. मग आता अच्छे दिन का नाही आले उलट आमचे बुरे दिन सुरु आहेत. असे म्हणत त्यांचे कपडे फाडून त्यांना मारहाण करण्यात आली. तेव्हा कसा बसा त्यांनी बचाव केला होता.

अभिनंदन पाठक यांना कोणतेही संरक्षण नाही ते कुठेही फिरत असतात तेव्हा सामान्य माणूस आपला राग प्रधानमंत्री मोदींच्यावर काढू शकत नाही पण त्यांच्या सारखे दिसणाऱ्या अभिनंदन पाठक यांच्यावर काढत आहे. सध्या त्यांच्यावर हल्ले होण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे याला वैतागून त्यांनी भाजप चा राजीनामा हि दिला आहे त्याअगोदर त्यांनी २० हुन अधिक पत्र नरेंद्र मोदी आणि योगी आदिनाथ यांना लिहिले आहेत पण त्यांनी कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली नाही. किंवा जनतेसाठी कोणतेही काम केले नाही. त्यामुळे भाजपचा त्यांनी राजीनामा देऊन वेगळ्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *