20 कोटी पगार मिळवतो हा फक्त पाचवी शिकलेला व्यक्ती…

प्रसिद्ध आणि श्रीमंत होण्याची आवड प्रत्येकाला असते. प्रत्येक जण भरपूर पैसे कमवून आरामात जीवन जगू इच्छितो, पण फक्त विचार केल्यानेच काही नाही होत. यासाठी प्रचंड मेहनत आणि चिकाटीची आवश्यकता असते. काही लोकांमध्ये हे स्वप्न पूर्ण करण्याची हिंमत असते.

सहसा बोलले जाते की चांगली पगार असेल तरच माणूस काही तरी करू शकतो. लोकं मानतात की चांगले शिक्षण मिळाले तरच चांगली नौकरी मिळते. पण ही गोष्ट अजिबात खरी नाहीये. काही लोकं असे पण जन्मलेले आहेत ज्यांनी ही गोष्ट पूर्णपणे खोटी ठरवली आहे. भारतात आणि परदेशात असे अनेक लोकं आहेत ज्यांनी कमी शिक्षण झालेले असूनसुद्धा पूर्ण जगभरात आपले नाव मोठे केले आहे.

आज आपण ज्या व्यक्तीविषयी माहिती बघणार आहोत ते त्यापैकीच एक आहेत. कमी शिक्षण झालेले असूनसुद्धा यांचे नाव देशातील सर्वात मोठ्या उद्योगपतींमध्ये सामील आहे.

धर्मपाल गुलाटी यांचा पगार आहे 20 कोटी-

एमडीएच मसाल्याचे नाव तर तुम्ही ऐकलेच असेल. हा ब्रँड जगभरातील सर्वात मोठ्या मसाल्यांच्या ब्रॅण्डपैकी एक आहे. या मसाल्यांनी जगात एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. या ब्रॅंडला टॉपवर पोहचवण्यात ज्या व्यक्तीचा हाथ आहे त्या व्यक्तीचं नाव आहे धर्मपाल गुलाटी. धर्मपाल गुलाटी यांचे वय हे 99 वर्षे आहे. विशेष म्हणजे त्यांचे शिक्षण फक्त पाचवी पर्यंत झालेले आहे. एवढं कमी शिक्षण झालेले असूनसुद्धा ते आज करोडो रुपये कमवत आहेत. तुम्ही ऐकून हैराण व्हाल की धर्मपाल गुलाटी यांचा पगार हा 20 कोटी रुपये आहे.

धर्मपाल गुलाटी हे एकमेव असे सीईओ आहेत ज्यांना भारतीय रिटेल बाजारात सर्वात जास्त पगार मिळतो. त्यांची मेहनत आणि चिकाटीच्या बळावर आज ते इथपर्यंत पोहचले आहेत. आपण अनेक वर्षांपासून त्यांना एमडीएचच्या जाहिरातीमध्ये बघत आलो आहोत. त्यांनी मागच्या वर्षी तब्बल 20 कोटी रुपये पगार घेतली आहे. या कंपनीने आपल्या मसाल्यांच्या किमती कमी करून बाकी कंपण्यावर मात केली आहे. गुलाटी हे फक्त मसाल्यातच नाही तर मनाने सुद्धा बादशहा आहेत. तेव्हाच ते आपल्या कमाईचा 90% भाग चैरिटीला देतात.

धर्मपाल गुलाटी यांच्या मसाल्यांना पूर्ण जगभरात निर्यात केले जाते. त्यांच्याद्वारे बनवल्या गेलेल्या या मसाल्यांची चव पूर्ण जगभरातील लोकांच्या जिभेवर राज करते. चांगले शिक्षण न मिळालेले असताना सुद्धा ते आज एका वेगळ्याच उंचीवर पोहचले आहेत. आणि संपूर्ण जगभरात आपले आणि भारत देशाचे नाव रौशन केले आहे. यामुळे हे बोलणं चुकीचं ठरेल की चांगले शिक्षण मिळाल्याने माणूस मोठा आणि प्रसिद्ध होऊ शकतो.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *