“रिक्षावाल्याची मुलगी IAS झाल्यावर बापाचे अशा प्रकारे मानले अभार ” वाचा या फोटो मागील सत्य

सोशल मीडियावर सध्या अनेक गोष्टी इतक्या झटकीपट वायरल होत असतात कि त्यांच्याबद्दल लोकांना खात्रीशीर माहिती पण नसते. सध्या एक अशीच पोस्ट प्रचंड वायरल होत आहे. तो फोटो पाहून अनेकांना आनंद तर कोणाच्या छातीत अभिमान हि उत्पन्न झाला असेल. आपण आता एक फोटो आहे ज्यात एक मुलगी एका म्हाताऱ्या माणसाला हातगाडी रिक्षा मध्ये बसवून स्वतः ओढत असतानाच फोटो आहे. त्या फोटो सोबत एक इंग्लिश मध्ये कॅप्शन आहे.”IAS topper, introducing her father to . Grand to hpeopleer and her father..” अशा पद्धतीची कॅप्शन देऊन फोटो वायरल केला गेला.

सर्वात प्रथम हा फोटो ट्विटर वर काँग्रेसचे नेते डॉ जे असलम बाशा यांनी त्यांच्या व्हेरिफाय ट्विटर वर हा फोटो प्रसिद्ध केला त्या फोटो ला जवळजवळ ४ हजाराहून अधिक लाईक आणि दीड हजार रिट्विट आल्या होत्या. त्या फोटोला अनेकांनी रिट्विट केले होते. काँग्रेसच्या अन्य नित्यांसहित सामान्य माणसे प्रसिद्ध व्यक्ती यांनी सुद्धा हा फोटो शेअर केला. या फोटोला फेसबुक वर सुद्धा प्रचंड प्रमाणात शेअर करण्यात आले.

या फोटो बाबत आम्ही माहिती घेतली तेव्हा समजले कि फोटो मधील मुलगी कोणी आयएएस टॉपर नसून ती एक सामान्य हौशी प्रवासी आहे जी अनेक शहराला भेटी देऊन त्याबद्दलच्या आठवणी लिहिते.हा फोटो श्रमणा पोदार हिचा असून तिने तो इंस्टाग्राम वर एप्रिल मध्ये पोस्ट केला होता. हा फोटो कोलकत्ता येथील आहे या फोटोतील व्यक्ती चे श्रमणा सोबत कोणतेही नाते नाही. हा फोटो तिने त्या रिक्षावाल्याला हाताने रिक्षा ओढून किती कष्ट होतात हे समजण्यासाठी तिने त्याचा रिक्षा ओढून पहिला. त्या दरम्यान हा फोटो काढण्यात आला. यावयात त्या जेष्ठ नागरिकाला हे सर्व दोन वेळच्या जेवणासाठी करावे लागते म्हणून तिला त्याबद्दल दुःख झालेले.

श्रमणा ने आपण आयएएस नसल्याचे सांगितले तसेच तिने अशा पद्धतीने लोक चुकीच्या पद्धतीने फोटो वायरल करत आहेत त्याबद्दल हि दुःख व्यक्त केले आहे. त्यामुळे आपण कोणता फोटो वायरल करत असाल तर थोडी खात्री करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *