गदर सिनेमातील हा छोटा सरदार आता कसा दिसतो?

गदर-एक प्रेम कथा हा सिनेमा एकेकाळी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवून गेला. या सिनेमात असलेली लव्हस्टोरी आणि या सिनेमातील डायलॉग लोकांना खूप आवडले. या सिनेमात दाखवण्यात आलेले कॅरॅक्टर सुद्धा लोकांना खूप आवडले होते. या सिनेमात दाखवण्यात आलेला सनी देओलचा मुलगा आठवतो का? तो आता मोठा झालाय. चरणजीत उर्फ जिते हा सनी देओलचा सिनेमातील मुलगा.

या छोट्या सरदारने आपल्या अभिनयाने लोकांना आपले फॅन बनवलं होतं. लहानपणी पासूनच अभिनयास सुरुवात केलेला जिते आता मोठ्या सिनेमात काम करत आहे. या छोट्या सरदारचे नाव आहे उत्कर्ष शर्मा. उत्कर्ष हा गदर सिनेमाचे डायरेक्टर अनिल शर्मा यांचा मुलगा आहे. छोटा सरदार आता मोठा झाला असून तो आता एका सिनेमातून आपल्या भेटीला येत आहे. सिनेमाचं नाव आहे जिनिअस. मागच्या वर्षीच मे मध्ये या सिनेमाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं.

हा सिनेमा 24 ऑगस्ट ला रिलीज झाला आहे. उत्कर्षने लहानपणीच सिनेमात काम करण्यास सुरुवात केली असली तरी वडील अनिल शर्मा त्याला चांगलं शिक्षण देऊ इच्छित होते. त्यामुळे त्यांनी मोठा झाल्यावर उत्कर्षला फिल्म मधील पुढील शिक्षणासाठी परदेशात पाठवले. उत्कर्षने चार वर्ष शिक्षण घेतले. त्यानंतर तो जेव्हा भारतात परतला तेव्हा वडिलांनी त्याला लाँच करण्याचा निर्णय घेतला.

उत्कर्ष आपल्या भेटीला येत असलेल्या जिनिअस मध्ये एका युवा शात्रज्ञाची स्टोरी दाखवण्यात आली आहे. यामध्ये हा शात्रज्ञ विज्ञानाकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन घेऊन येतो. सिनेमा गदरचे डायरेक्टर अनिल शर्मा यांनी दिग्दर्शित केला आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *