असुद्दीन ओवैसी यांच्या बद्दलच्या अशा काही गोष्टी ज्या कधीच समोर नाही आल्या..

हैद्राबादमधून 3 वेळा खासदार राहिलेले ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुस्लमिन या पक्षाचे सर्वेसर्वा असुद्दीन ओवैसी यांना 2014 मध्ये संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्याबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे. जाणून घेऊया असुद्दीन ओवैसी यांच्याबद्दल माहिती नसलेल्या काही खासरे गोष्टी..

1)अभ्यासू व्यक्तिमत्व लंडन विद्यापीठातून बॅरिस्टर ही पदवी मिळवली त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर व संविधान यांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव. 2)ते कधीही मोर्चे आंदोलन करत नाही आणि समाजाचा वेळ पैसा वाया घालवत नाहीत.जे काय आहे ते संसदेत आणि न्यायालयीन पद्धतीने प्रश्न सोडवतात 3)असदोद्दीन ओवैसी यांचे वडील सलग 6 वेळा खासदार व ते सलग 3 वेळा खासदार. तसेच सलग संसदरत्न पुरस्कार पटकवतात. 4)महाराष्ट्रात कितीतरी मोठे मराठा नेते असताना लाखोंचे मोर्चे निघून पण मराठ्यांना आरक्षण देऊ शकले नाही. पण हैद्राबाद मध्ये एकट्या ओवैसी यांनी मुस्लिम समाजाला आरक्षण लागू केल. 5)गोरगरीब समाजातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी KG ते PG पर्यंत मोफत स्वतःच्या शाळा व महाविद्यालये स्थापन.व ईतर सर्व कोर्सेस ची महाविद्यालये स्थापन. 6) सामान्य माणूस उपचाराविना पैशाअभावी मेला नाही पाहिजे म्हणून देशातील सर्वात मोठे 2500 बेडचे ओवेसी हॉस्पिटल व दुसरे 1000 बेडचे आसरा हॉस्पिटल असे दोन दवाखाने सुरू केले.या हॉस्पिटल मध्ये पूर्ण माणसाची बॉडी फाडून ऑपरेशन केलं तरी फक्त 90 हजार रुपये खर्च येतो. 7) संसदेत सर्व दिवस हजर राहुन सतत समाजातील लोकांचे प्रश्न मांडत असतात 8)दर आठवड्याला ते जनता दरबार भरवतात व नागरिकांचे प्रश्न जाणून घेतात.

9) झेड प्लस सुरक्षा असताना सुदधा या सुखसोई नाकारणारे खासदार 10)आजपर्यंत एकही भ्रष्टाचाराचा,दंगलीचा आरोप नाही. 11)त्यांच्या ऑफिसला दरवाजा नाही कोणीही सामान्य व्यक्ती जाऊन सहज भेटू शकतो. 12)आलिशान ऑफिस किंवा बसायला आलिशान खुर्ची नाही ते आजही लाकडी टेबल लाकडी खुर्ची व पाणी प्यायला स्टील चा ग्लास वापरतात 13)उत्तम क्रिकेटर.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *