शिवसेनेचा तो नगरसेवक नसता तर आज पृथ्वी शॉ क्रिकेटमध्ये दिसला नसता…

भारत विरुद्ध विंडीज पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा युवा प्रतिभावान खेळाडू पृथ्वी शॉने शानदार शतकी खेळी करत पदार्पणातच शतक ठोकयणाचा मान मिळवला आहे. कसोटी पदार्पणात भारताकडून अशी कामगीरी करणारा तो 14 वा खेळाडू बनला आहे. पृथ्वीने अवघ्या 99 चेंडूंचा सामना करत हे शतक ठोकले आहे. 100 पेक्षा कमी चेंडूत पदार्पणात शतक ठोकणारा तो जगातील तिसरा क्रिकेटपटू बनला आहे.

यावर्षीच U-19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया संघावर दणदणीत विजय मिळवत भारतीय संघाने चौथ्यांदा वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलं होतं. भारताने याआधी 2000, 2008 आणि 2012 साली U-19 वर्ल्डकप जिंकला होता. या वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व सुद्धा मुंबईच्या या प्रतिभावान फलंदाज पृथ्वी शॉ कडे होते. कर्णधार पृथ्वी शॉ याने त्याच्या क्रिकेट करिअर मध्ये अनेक अडचणींचा सामना केला आहे. पण त्याला साथ मिळाली होती ती म्हणजे एका शिवसेनेच्या नगरसेवकाची. जाणून घेऊया कोण होता तो शिवसेनेचा नगरसेवक.

वर्ल्डकप जिंकल्यानंतर भारतीय संघ जेव्हा भारतात दाखल झाला होता, त्यानंतर पृथ्वी शाॅ याने शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. पृथ्वी शॉचा मातोश्रीवर सत्कार करण्यात आला होता. पृथ्वी शॉ ला सुरुवातीपासूनच शिवसेनेकडून खूप मदत मिळाली आहे.

पृथ्वी शॉच्या वडिलांची परिस्थिती हालाखीची होती. त्याच्या वडिलांनी मात्र त्याला क्रिकेटचे धडे घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. पृथ्वी शॉ चे वडील सुरुवातीच्या काळात त्याला घेऊन विरार ते दादर असा प्रवास करायचे. त्यांना यामध्ये अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असे. ऊन वारा पाऊस यांची तमा न बाळगता पृथ्वी आणि त्याचे वडील हा प्रवास करायचे. पृथ्वी शॉ ची मेहनत आणि जिद्द पाहून त्यांच्या मदतीला धावून आले शिवसेनेचे एक नगरसेवक. तत्कालीन नगरसेवक आणि आताचे वाकोल्यातले सेना आमदार संजय पोतनीस यांनी पृथ्वी शॉ चा सर्व खर्च उचलला. एवढेच नव्हे तर त्याला शिवाजी पार्कजवळ राहायला घरही मिळवून दिले. आमदार पोतनीस यांनी केलेली मदत पृथ्वीच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली.

आमदार संजय पोतनीस यांनी केलेल्या या मदतीची जान आजही पृथ्वीला आहे. तो आजही सांगतो की पोतनीस यांनी त्यावेळी मदत केली नसती तर मी आज क्रिकेट खेळताना दिसलो नसतो.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *