नवनीत कौर राणा यांचा दांडियातील डान्स तुफान वायरल, बघा व्हिडिओ..

नवनीत राणा कौर यांच्या बद्दल महाराष्ट्रात नेहमीच एक उत्सुकता राहिलेली आहे.त्यांनी लोकसभा निवडणूक लढवल्यानंतर राज्यात सर्वत्र त्यांची चर्चा झाली होती.तेव्हा विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपने त्यांची अश्लील फोटो वायरल करून वेगळ्या प्रकारचा प्रचार केला होता. नवनीत कौर या दाक्षिणात्य अभिनेत्री असून त्यांचे चित्रपट दक्षिण भारतात चालले आहेत. सध्या अमरावती मध्ये गरब्याच्या निमित्ताने नवनीत कौर यांनी डान्स केला. त्या डान्स ची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. आणि त्यांच्या सुंदर डान्स बद्दल सर्वत्र कौतुक ही सुरू आहे. एक अभिनेत्री असणाऱ्या नवनीत सध्या एक राजकीय महिला म्हणून वावरत असतात.त्यात असा त्यांचा डान्स वायरल झाल्याने लोकांना त्यांचे नृत्ये कौशल्य पाहता आले..

अमरावतीत आमदार रवी राणा यांनी, 2011 साली रेकॉर्ड ब्रेक सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन केलं होतं. त्यावेळी स्वत: रवी राणा आणि नवनीत कौर हे विवाहबद्ध झाले होते. यावेळी तब्बल 3100 जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा पार पडला होता.तेव्हापासून चित्रपट सृष्टी सोडून नवनीत या सामान्य जीवन व्यथित करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *