अभिनेत्री रेखा खरोखरच संजय दत्तच्या नावाचे कुंकू लावते का? काय आहे सत्यता

अभिनेता संजय दत्तच्या जीवनावर आधारित असलेल्या संजू सिनेमाने बॉक्स ऑफीसवर विक्रमी गल्ला जमा केला आहे. 2018 मधील सर्व रेकॉर्ड मोडत हा सिनेमा सुपरहिट सिनेमाच्या यादीत पोहचला आहे. संजय दत्तच्या जीवनातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी प्रेक्षकांना सिनेमाच्या माध्यमातून समजत आहेत. प्रेक्षकांनी या सिनेमाला चांगला प्रतिसाद दिला आहे. संजय दत्तच्या आयुष्यातील चढ उतार सिनेमात दर्शविण्यात आले आहेत.

संजय दत्तच्या आयुष्यात किती गर्लफ्रेंड होत्या याबाबत सिनेमात एक संवाद आहे. जो प्रेक्षकांमध्ये हशा पिकवतो. कारण या प्रश्नाचे उत्तर संजय दत्त 308 देतो. संजय दत्तच्या गर्लफ्रेंडच्या यादीत काही सुप्रसिद्ध अभिनेत्रीचे नावं देखील आहेत. संजय दत्तने रॉकी या सिनेमाद्वारे बॉलीवूड मध्ये एन्ट्री केली होती. या सिनेमातील अभिनेत्री टीना मुनीम सोबत त्याचे प्रेमसंबंध होते. पुढे अभिनेत्री ऋचा शर्मा सोबत तर संजय दत्तने लग्नही केले. ऋचाचे ब्रेन कॅन्सरने निधन झाले. त्यानंतर माधुरी दीक्षित, रिया पिल्लई, लिजा रे या अभिनेत्रीसोबत देखील संजय दत्तचे प्रेमसंबंध होते.

संजय दत्त एकेकाळी अभिनेत्री रेखासोबत देखील रिलेशनशिप मध्ये होता. जमीन आसमा सिनेमाच्या शूटिंगदरम्यान दिघांचे प्रेमसंबंध जुळले. संजय दत्त आणि रेखा यांना काही खाजगी कार्यक्रमात सोबत बघितले गेले. त्यानंतर त्यांनी लग्न केल्याच्या देखील बातम्या आल्या होत्या. रेखा संजय दत्तच्या नावाचे कुंकू लावते अशी देखील लोकांमध्ये चर्चा आहे. जाणून घेऊया काय आहे यामागची सत्यता खासरेवर..

यासीर उस्मान यांच्या पुस्तकात रेखा आणि संजय दत्त यांचे गुपचूप लग्न झाल्याचा धक्कादायक खुलासा केला होता. संजय दत्त व्यतिरिक्त रेखाचे नाव अमिताभ बच्चन यांच्यासोबत देखील नेहमी जोडले जाते. अमिताभ यांच्या नावाचे कुंकू लावते असं बऱ्याचदा बोललं जातं. पन यासीर उस्मान यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की ही अफवा आहे. अशा प्रकारची कुठलीही माहिती पुस्तकात छापण्यात आलेली नाहीये. लोकांनी वाचताना चुकीचा अर्थ काढल्याचे त्यांनी सांगितले होते. संजय दत्तने देखील याबाबत अधिकृत स्टेटमेंट देत रेखासोबत लग्न न झाल्याचे सांगितले होते.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *