एन्काऊंटर मध्ये ठार केलेल्या नक्षलवाद्याच्या मुलीचं हे पत्र वाचल्यानंतर कोणीच नक्षलवादी बनणार नाही…

नक्षलवादाने आमच्या गावात दहशत माजवली आहे. सरकारच्या जेवढ्या पण विकास करण्यासाठी योजना आहेत त्या हे गावात होऊ देत नाहीत. हे नक्षलवादी गावातील लोकांना धमकावून पैसे मागतात. हे नक्षलवादी आमच्या गावात रोडसुद्धा होऊ देत नाहीत. ज्यामुळे आजही गावातील लोकांना येण्या जाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतो. नक्षलवादी हे शिकलेले नसतात. त्यांच्यामध्ये थोडीही माणुसकी नसते. ते गरिबांच्या घरी जाऊन त्यांना मारहाण करून बळजबरीने जेवण करतात. त्यांना त्यांच्या घरी अन्न आहे का नाही हे पण माहिती नसते. नक्षली परिवार आणि देशाला लागलेली एक कीड आहेत. नक्षलवाद आपल्या सर्वांनी मिळून संपवला पाहिजे.

नेहा कुमारी
वडील स्व.अजय यादव, गाव माहुडड, रोल नंबर 58

हे शब्द आहेत एन्काऊंटर मध्ये ठार करण्यात आलेल्या एका नक्षलवाद्याच्या मुलीचे. ती नक्षली विचाराने थोडीही प्रभावित नाहीये हे यावरून लक्षात येते. नेहा कुमारीने हे पत्र निबंध लेखन स्पर्धेत लिहिले आहे. ज्या शाळेत नेहा शिक्षण घेते ती शाळा 8 वर्षांपूर्वी तिच्या वडिलांनी स्फोट घडवून उडवली होती. नेहाचे वडील अजय यादव यांचाही मृत्यू झाला आहे. अजय कुमार हा नक्षलींचा झोनल कमांडर होता. लोकं त्याला अजयजी म्हणून ओळखायचे. अजय यादव वर तब्बल 25 लाखांचा इनाम देखील होता. यावर्षीच मार्चमध्ये पलामु जिल्ह्यात मोहमदगंजच्या सिताचूआ जवळ त्याचा आणि त्याच्या दोन साथीदारांचा पोलिसांनी एन्काऊंटर मध्ये खात्मा केला होता.

अजयचा भाऊ अमृत सुद्धा नक्षलवादी होता. त्याचा पोलिसांनी अगोदरच छत्रपुर मध्ये खात्मा केला होता. अजय यादवने 2015 मध्ये सात पोलिसांना लँड माईन स्फोटात मारले होते.

लोकांच्या मते अजय हा पैश्यांसाठी लालची होता. त्याने अनेक लोकांचे पैसे घेतलेले होते. त्याच्या या गोष्टीमुळे लोकांनी त्याला मारले देखील होते. तो फक्त स्वतःबद्दलच विचार करायचा. पण इथे प्रश्न पडतो की त्याच्या आणि त्याच्या भावाच्या मृत्यूनंतर कुटुंबाला काय मिळाले? जे घर होते ते पण सील करण्यात आले होते. त्याच्या मुलीने लिहिलेले हे पत्र इतर नक्षलवाद्यांचे डोळे उघडण्यासाठी पुरेसे आहे. या मुलीने सांगितल्याप्रमाणे सोयी सुविधांच्या आड देखील नक्षलवाद येत आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *