महाराष्ट्राची शान असलेल्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या इमारतीबद्दल खासरे माहिती..

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या इमारतीला 20 मे ला 130 वर्षे पूर्ण झाले. या रेल्वे स्टेशनला अगोदर व्हिक्टोरिया टर्मिनस (व्हिटी) नावाने ओळखले जायचे. स्थापत्य शास्त्राचा उत्कृष्ट नमुना असलेली ही इमारत मुंबईच्या सौंदर्यात भर घालते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारतात ताज महाल नंतर सर्वात जास्त फोटो या इमारतीचे काढले जातात. या इमारतीचे डिझाइन फ्रेडरिक स्टीवेन्सने तयार केले होते. या इमारतीच्या बांधकामासाठी तब्बल 1 दशक कालावधी लागला होता.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या इमारतीचे बांधकाम 1978 मध्ये सुरू झाले होते आणि ते 1987 मध्ये पूर्ण झाले. महाराणी व्हिक्टोरिया यांच्या नावावरून इमारतीला व्हिक्टोरिया टर्मिनस नाव देण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या इमारतीला बनवण्याकरीता 16,13,863 रुपये खर्च झाला होता. स्टीवेन्स यांनी डिझाइन केलेल्या या वास्तूला त्याकाळी आशिया खंडातील सर्वात मोठी वास्तू म्हणून ओळख होती. 1996 मध्ये या वास्तूचे नाव बदलून छत्रपती शिवाजी टर्मिनस (CST) असे ठेवण्यात आले होते. जुलै 2017 ला पुन्हा यामध्ये बदल करून ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे करण्यात आले. 2004 मध्ये युनेस्कोने या भवनाला वास्तू कलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून जागतिक वारसा यादीत स्थान दिले होते.

पूर्ण इमारतीचा सर्वोत्कृष्ट बिंदू हा मुख्य घुमट आहे. त्यावर महिलेचा एक विशाल पुतळा आहे ज्याची उंची 16 फूट 6 इंच आहे. डाव्या हातात एक ज्वलंत मशाल आहे आणि उजव्या हातात एक चाक आहे जे प्रगतीचे प्रतीक आहे. या इमारतीचे डिझाइन हे गॉथिक शैलीचे आहे ज्याला भारतीय संदर्भानुसार बांधण्यात आले.

1029 मध्ये या स्टेशनवर 10.4 लाख रुपये खर्चून 6 प्लॅटफॉर्म बनवण्यात आले होते. नंतर पुनर्निर्माण केल्यानंतर इथे 13 प्लॅटफॉर्म झाले. यार्ड आणि स्टेशन मध्ये त्यावेळी काही बदल करण्यात आले होते. 1994 मध्ये येथील प्लॅटफॉर्मची संख्या 15 झाली. सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला 18 प्लॅटफॉर्म आहेत. पूर्वेकडून प्रवेश करण्यासाठी मोकळी जागा आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या शताब्दी निमित्ताने एक डाक तिकीट देखील प्रकाशित करण्यात आले होते.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *