हा फोटो काढणार्‍या फोटोग्राफरचे पुढे काय झाले? नक्की वाचा थक्क व्हाल..

काही अशा गोष्टी असतात कि ज्याच्या पाठीमागे एक कथा दडलेली असते. अशाच गोष्टी मध्ये एक फोटो सुद्धा आहे. आपण जो फोटो पाहत आहेत त्या फोटो पाठीमागे अत्यंत दर्दनाक कहाणी लपलेली आहे. हा फोटो एका प्रसिद्ध अमेरिकन फोटो जर्नालिस्ट ने काढलेला आहे. हा फोटो जगप्रसिद्ध पुलित्झर अवार्ड मिळवलेला फोटो आहे. हा फोटो केविन कार्टर या फोटो जर्नालिस्ट ने काढला आहे.

हा फोटो दक्षिण आफ्रिकेतील सुदान या देशातील १९९३ साल मधील आहे. त्यावेळी या देशात गृहयुद्ध सुरु होते त्यामुळे या देशात प्रचंड भूकमारी सुरु झाली होती. अन्नाच्या एका घासासाठी लोक मरत होते. हा फोटो जेव्हा काढल्या जात होता. तेव्हा त्या बाळाचे आई वडील जंगलात अन्न शोधायला गेली होती तर ते बाळ घराच्या बाहेर येत भुकेने व्याकुळ होऊन तडफडत पुढे सरफटत होते आणि त्या बाळाच्या पाठी मागे गिधाड हे ते बाळ कधी मरणार याची वाट पाहत बसलेले. हा फोटो केविन कार्टर याने तेव्हा काढला.

सुदान मध्ये त्यांनी अनेक फोटो काढले होते पण हा फोटो त्यांना वेगळा वाटला होता हा फोटो त्यांनी न्यूयार्क टाइम्स या प्रसिद्ध न्यूजपेपर ला विकला आणि त्यांनी हा फोटो २६ मार्च २९९३ साली न्यूयार्क टाइम्स मध्ये ” Metaphor for Africa’s despair “ या कॅप्शन सहित हा फोटो छापला. हा फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर जगभरात खळबळ माजली.

केविन कार्टर यांच्या वर लाखो लोकांनी प्रश्नाची सरबत्ती केली. त्यांनी त्यामुलाला का वाचवले नाही असे प्रश्न केले. फोटो काढणे महत्वाचे होते का ? असा प्रश्न निर्माण केला. युनाइटेड नेशन ने त्यावेळी फोटोग्राफर आणि पत्रकारांना चेतावणी दिली होती कि त्यांनी सुदान मधील लोकांना स्पर्श करायचा नाही किंवा त्यांच्या जवळ जायचे नाही. या कारणामुळे केविन यांना त्या मुलाला काही खाऊ घालता आले नाही पण त्यांनी तेव्हा तेथील गिधाडाला पळवून लावले.

या फोटो ला प्रसिद्ध पुलित्झर अवार्ड मिळाला पण केविन हे या जगप्रसिद्ध पुरस्काराने खुश नव्हते. त्यांच्या मनात आपण त्या मुलाला वाचवू शकलो नाही हाच विचार राहिला आणि तीन महिन्यांनी आत्महत्या केली. केविन कार्टर यांचा फोटो मात्र युद्धानंतर चे भीषण जीवन भूकमारी चे उदाहरण म्हणून जगभरात प्रसिद्ध पावला. हा फोटो सर्वाधिक वायरल झालेला फोटो म्हणून हि परिचित आहे. या फोटो मागे दोन जीव गेले आहेत. एक त्या छोट्या मुलाचा पण दुसरा जीव फोटो काढणाऱ्या केविनचा हि गेला.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *