एकेकाळी कॉलसेंटर वर काम करणारी ही मुलगी आज आहे बॉलिवूडची बोल्ड आणि फेमस अभिनेत्री..

बॉलीवूडमध्ये घडणाऱ्या नवनवीन गोष्टी रोज आपल्याला ऐकायला मिळतात. सेलेब्रिटींची लाइफस्टाइल ही वेगळ्याच प्रकारची असते. बॉलीवूड मध्ये प्रत्येक प्रकारचे कलाकार आहेत. काही कलाकार असे आहेत ज्यांचे आईवडील हे बॉलीवूड मध्ये आहेत तर काही एखाद्या सामन्य कुटूंबातून येऊन काहीही फिल्मी बॅकग्राऊंड नसताना बॉलिवूडमध्ये एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहचले आहेत.

या लिस्टमध्ये सामावेश असलेल्या एका यशस्वी अभिनेत्रीने केलेला प्रवास आपण जाणून घेउया. आज ही अभिनेत्री करोडो लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. आज आपण या अशा अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत जी लहानपणी डॉक्टर व्हायचं स्वप्न बघायची. परंतु घरची परिस्थिती चांगली नसल्याने तिला चक्क कॉल सेंटरमध्ये काम करावं. पण तिने या परिस्थितीवर मात केली आणि आता ती बॉलीवूडमधील सर्वात बोल्ड आणि प्रसिद्ध अभिनेत्री पैकी एक म्हणून ओळखली जाते. चला बघूया कोण आहे ही अभिनेत्री..

आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत ती अभिनेत्री आहे जरीन खान. जरीन खानने बॉलीवूडमधील अभिनेत्री बनण्यापर्यंत खूप संघर्ष केला आहे. 14 मे 1984 रोजी एका पठाणी कुटुंबात जन्मलेल्या जरीन खानने एका साधारण शाळेत शिक्षण घेतले. नंतर तिने उच्च शिक्षण रिजवी कॉलेज ऑफ सायन्स मधून घेतले. तिचे लहानपणीपासून डॉक्टर बनण्याचे स्वप्न होते. पण तिच्या घरची परिस्थिती बिकट असल्याने तिला कॉल सेंटरवर जॉब करावा लागला.

तुम्हाला जाणून आश्चर्य होईल की जरीन खान आता जशी दिसते तशी ती नव्हती. सुरवातीच्या काळात ती बरीच जाड होती. त्यावेळी तिला बघून कोणी विचारही केला नसेल की ही बॉलिवूडमध्ये एका मोठी अभिनेत्री बनेल. तिने जिम जॉईन करून आपले वजन कमी केले. वजन कमी केल्यानंतर तिने मॉडेलिंग सुरू केली. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी तिने एका तामिळ सिनेमात आयटम सॉंग केले होते. जे लोकांना खुप आवडलं होतं.

हए गाणं प्रसिद्ध झाल्यानंतर सलमान खानची नजर तिच्यावर पडली. त्याने तिला लाँच करण्याचा निर्णय घेतला. जरीनने वीर या सिनेमामधून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. जरीन लोकांच्या पसंतीस उतरली पण हा सिनेमा तेवढा चालला नाही. आज तिचे नाव बॉलीवूडच्या सफल अभिनेत्रीमध्ये घेतले जाते. तिच्या या यशाचे श्रेय सलमान खानला जाते. त्याने तिला एन्ट्री दिल्यामुळे ती मोठमोठे सिनेमे करू शकली.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *