जगातील सर्वात प्रसिद्ध ई गेम PUBG विषयी काही खासरे गोष्टी…

आज सगळीकडे तरुणाईला एकच वेड लागलेलं आहे तो खेळ म्हणजे PUBG. परंतु pubg विषयी आपल्याला फार कमी माहिती आहे. PUBG म्हणजेच Player Unknown Battle Ground हा गेम जगात सर्वात जास्त खेळल्या जात आहे. आज या गेमविषयी बघूया काही खासरे माहिती..

ब्रेंडन ग्रीनने या गेमची निर्मिती केली आहे. ARMA 2 या गेममध्ये तो Player Unknown या नावाने खेळायचा म्हणून त्याने स्वतःच्या गेमलाही हेच नाव दिले आहे. Dota 2 या गेमचा रेकोर्ड PUBG ने मोडला आहे एका वेळेस 1,342,857 एवढे प्लेयर या गेम मध्ये सप्टेंबर २०१७ ला खेळले आणि हा एक विश्वविक्रम ठरला होता. Battle Royal या गेमपासून PUBG करिता ब्रेंडनने कल्पना घेतलेली आहे.

जिंकल्यावर winner winner chicken dinner हे वाक्य आपल्याला दिसते मुळात हे वाक्य जुन्या काळात पत्ते खेळताना वापरले जात होते. जो जिंकल तो हे वाक्य बोलत होता. १४ मार्च २०१७ला pubg ने या गेमची अर्ली असेस देणे सुरु केले आणि तीन आठवड्यात गेमच्या तब्बल २० लाख प्रती विकल्या गेल्या. २०१७ मध्ये सर्वाधिक खेळल्या गेलेला गेम PUBG हा आहे.

PUBG या गेमने नुकतीच जाहिरात करायला सुरवात केली आहे. परंतु आत्तापर्यंत हा गेम फक्त माउथ टू माउथ पब्लिसिटीने वाढलेला आहे. लवकरच PUBG Xbox One करिता रिलीज होणार आहे. २.५५% PUBG चे शेअर असणारे मालक हे CS Go चे प्लेयर आहेत. पीसीच्या PUBG गेम मध्ये रेकोर्डिंग व्यवस्था असल्याने हा गेम जास्त प्रसिद्ध झाला असे सांगण्यात येते.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *