भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने दुमदुमले स्टेडियम..

रोहित शर्माच्या कप्तानीमध्ये टीम इंडियाने काल दुबईत खेळल्या गेलेल्या सामन्यात पाकिस्तानचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवून, आशिया चषकाच्या प्राथमिक साखळीत सलग दुसरा विजय साजरा केला. भारताने या विजयासह अ गटात अव्वल स्थान कायम राखले आहे. दुबई इन्टरनॅशनल स्टेडियमवरच्या या सामन्यात पाकिस्तानला अवघ्या 163 धावात रोखलं. टीम इंडियाने अवघ्या 29 षटकांत ते लक्ष्य गाठून पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. रोहित शर्मा आणि शिखर धवनने 86 धावांची भागीदारी रचून भारतीय डावाचा पाया रचला. रोहित शर्माने 39 चेंडूंमध्ये 52, तर शिखर धवनने 54 चेंडूत 46 धावांची खेळी केली.

या सामन्यात भारत आणि पाकिस्तानच्या संघाला सपोर्ट करणारे चाहते होतेच पण दुबईतील स्टेडियम मध्ये चक्क गणपती बाप्पाचा जयघोष बघायला मिळाला. बघा व्हिडीओ..

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *