फकीर म्हणवून घेणाऱ्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची संपत्ती पाहून आपण थक्क व्हाल..

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या संपत्ती बद्दल प्रधानमंत्री कार्यलयाने काल सोमवारी खुलासा करून नरेंद्र मोदी यांची संपत्ती जाहीर केली आहे. आज पर्यंत मोदी जी यांची प्रतिमा हि त्यांनी एक फकीर अशी बनवलेली आहे. एक झोळी घेतली कि ते कुठेही जाऊ शकतात अशी त्यांची प्रतिमा आपल्या समोर आलेली आहे. त्यांनी हि जाहीर भाषणात देशातील जनतेला आपण फकीर आहोत असेच सांगितले आहे.

जर मोदीजी हे स्वतःला फकीर म्हणवत असतील तर देशातील प्रत्येक नागरिक हा मोदी जी सारखाच फकीर व्हावा अशी भावना आपल्या मनात जरूर येईल. तर आपण पाहूया नरेंद्र मोदींजीं यांची संपत्ती किती आहे ते त्यानुसार नरेंद्र मोदींकडेजवळपास फक्त 50 हजार रुपये रोकड आहे. विशेष म्हणजे गतवर्षी मोदींकडे 1.50 लाख रुपये रोकड होती. मात्र, आता मोदींकडे केवळ 48 हजार 944 रुपयांची रोख रक्कम आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची एकूण संपत्ती 2.28 कोटी रुपये आहे. त्यामध्ये जवळपास 1 कोटी 28 लाख रुपये स्थावर आणि गांधी नगरमध्ये काही जंगम मालमत्ता आहे. पंतप्रधान मोदींनी 2002 मध्ये एक लाख रुपयांच्या किमतीत 3531.45 स्क्वेअर फुटाची संपत्ती खरेदी केली होती. गुजरातच्या गांधीनगर येथील एसबीआय बँकेच्या शाखेत मोदींचे खाते आहे. त्यामध्ये 11,29,690 रुपये जमा आहेत. तसेच पंतप्रधान मोदींनी 1 कोटीपेक्षा अधिक रुपये फिक्स डिपॉजीट केले आहेत.

मोदींनी आणखी काही ठिकाणीही बचत केली आहे. ज्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड डिपॉजीट 20 हजार रुपये आहे. मात्र, ही आकडेवारी 25 जानेवारी 2012 पर्यंतची आहे. त्यासह मोदींनी नॅशनल सेव्हींग सर्टिफिकेटमध्ये 5,18,235 रुपये जमा केले आहेत. तर 1,59,281 रुपये एलआयसीमध्ये जमा आहेत.

दरम्यान, मोदींजवळ सोन्याच्या 4 अंगठ्या आहेत. ज्याची किंमत 1 लाख 38 हजार रुपये आहे. विशेष म्हणजे मोदींनी बँकेकडून 1 रुपयाचेही कर्ज घेतले नाही.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *