या २६ वर्षीय अभिनेत्रीला एक सोशल मीडिया पोस्ट टाकण्यासाठी मिळतात २४ कोटी !

वेगवेगळे अपडेट मिळवण्याचे देण्याचे साधन म्हणून जरी आपण सोशल मीडियाकडे पाहत असू तरी यामाध्यमातून ज्यांना चांगली फॅन फॉलविंग आहे. त्यांना चांगले पैसे हि मिळतात. अनेक सेलिब्रेटी सोशल मीडियावर पोस्ट टाकून चांगलाच पैसा कमावतात. या पोस्टसाठी काही जण हजारोत तर काही जण लाखोत कमावतात. पण तुम्हाला माहीत आहे का, एका सेलिब्रेटीला केवळ एक पोस्ट टाकण्यासाठी 24 कोटी मिळतात. ही सेलिब्रेटी कोणी बॉलिवूडमधील नसून ही हॉलिवूडची सेलिब्रेटी आहे.

हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका सेलिना गोमेजला एक पोस्ट टाकण्यासाठी 24 करोड रुपये मिळतात असे डब्ल्यू या मासिकाने नुकतेच त्यांच्या एका बातमीत म्हटले आहे. सेलिना केवळ 26 वर्षांची आहे. तिचे सोशल मीडियावर प्रचंड फॉलोव्हर्स आहेत. ती गायनासोबतच विजार्ड ऑफ वेवर्ली या मालिकेतील एलेक्स रुसोच्या भूमिकेसाठी ओळखली जाते. तसेच ती अँड द सीन नावाच्या पॉप बँडची मुख्य गायिका आहे.

सेलिना गोमेज हि प्रसिद्ध गायक जस्टिन बीबर सोबतच्या प्रेम संबधाने हि चर्चेत आली होती. अजून महत्वाची गोष्ट तिने या मुलाखती मध्ये सांगितली आहे ती म्हणजे तिला किडनीचा आजार झाला होता आणि त्यामुळे ती त्या आजाराने त्रस्त झाली होती पण तिच्या फ्रांसिया नावाच्या मैत्रिणीने तिला किडनी दान देऊन जीवनदान दिलेले. २०१७ साली तिच्यावर किडनी प्रत्यारोपण करण्यात आले. व तिच्या नवीन जीवनाला सुरुवात झाली.आज सेलिना हि प्रचंड प्रसिद्ध आहे निवळ फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम च्या पोस्ट वरून तिला एका पोस्ट मागे २४ कोटी रुपये मिळतात.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *