मुंबईच्या नितीन सोबत जे झाले ते वाचून तुम्ही कोणालाही लिफ्ट देण्याच्या अगोदर शंभर वेळा विचार कराल..

आपल्यापैकी अनेकांना दुचाकीवर किंवा चारचाकी मध्ये कुठे बाहेर जाताना कोणी रस्त्यात लिफ्ट मागितली तर ती देण्याची सवय असते. आपण विचार करतो की एकटं जाण्याऐवजी आपण लिफ्ट दिली तर आपलं कुठे काय नुकसान होणार आहे. उलट काही तरी चांगलं काम आपल्या हातून घडलं अशी आपली भावना असते. रस्त्यावरील लोकांची लिफ्ट देऊन एकप्रकारे सेवा केल्याची भावना आपण ठेवतो. पण आज आपण एक असा अनुभव वाचणार आहोत जो वाचून तुम्ही यानंतर कोणालाही लिफ्ट देण्याच्या अगोदर शंभर वेळा विचार कराल. कारण एखाद्या अनोळखी व्यक्तीला लिफ्ट देणं तुमच्यासाठी महागात पडू शकते. खासरेवर जाणून घेऊया नेमकं कसं महागात पडू शकते..

रस्त्यावरून गाडीमध्ये किंवा गाडीवर जाताना लिफ्ट देण्याच्या अगोदर विचार करा कारण अनोळखी व्यक्तीला लिफ्ट देणे कायद्याने गुन्हा आहे. तुम्हाला अनोळखी व्यक्तीस गाडीत बसवणे चलन देण्यास कारणीभूत ठरू शकते. लिफ्ट देऊन तुम्ही एकप्रकारे एक अपराध करताय असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही.

याचे ताजे उदाहरण म्हणजे मुंबईचा नितीन आहेत. एका नामांकित सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करणारे नितीन रोज आपल्या कारने ऑफिसला जातो. रस्त्यात जाणाऱ्या अनेकांना लिफ्ट देण्याची त्यांची सवय आहे. नेहमीप्रमाणे 18 जूनला ते ऑफिसला जात होते. पाऊस चालू होता, रस्त्यात दोघांनी त्यांच्या गाडीला हाथ दाखवला आणि त्यांनीही गाडी थांबवली आणि त्यांना बसवलं. थोडं पुढे गेल्यावर ट्राफिक पोलिसांनी गाडी अडवली आणि लायसेन्स मागितले. पोलिसांनी बसलेले लोक कोण आहेत असा प्रश्न केला. तर नितीन यांनी लिफ्ट दिल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यांना चलन भरण्यास सांगितले. कारण मोटर व्हेहिकल ऍक्ट 66/192 नुसार अनोळखी माणसाला गाडीत बसवल्याबद्दल त्यांचं 2000 रुपयांचं चलन कापण्यात आलं.

आणि धक्कादायक म्हणजे हर कलम लावल्यानंतर तुमचं लायसन्स जप्त होतं आणि ते आपल्याला कोर्टातूनच परत मिळते. यामुळे नितीन यांना कोर्टात चक्कर मारावी लागली. त्यांना तब्बल 5 दिवसांनी आपलं लायसन्स परत मिळालं. त्यांनी फेसबुकद्वारे ही घटना लोकांना सांगितली. त्यांची ही पोस्ट मोठ्या प्रमाणावर शेअर केली जात आहे.

नवी मुंबई पोलिसांकडून घटनेची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी याला होकार दिला. घटना खरी असल्याचे सांगितले. आपल्या खाजगी वाहनात अनोळखी व्यक्तीला लिफ्ट देणे व्यावसायिक मानले जाते. खाजगी वाहनात व्यावसायिक वाहतूक गुन्हा आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *