३० वेळेस नौकरीत रिजेक्ट झाला, २ कंपन्या बंद पडल्या तरी तो हरला नाही, आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती: जैक मा

एक युवक जो विद्यापीठात प्रवेश परीक्षेत दोन वेळ नापास झाला. एक असा व्यक्ती ज्याला KFCसहित अनेक कंपनीमध्ये जॉब करिता रिजेक्ट करण्यात आले. अशा अवस्थेत साधारण व्यक्ती हरतो परंतु तो हरला नाही परिस्थितीशी झुंजला. सध्या तो आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. तो पडला, उठला आणि परत जोमाने कामाला लागला आज तो अलिबाबा एक्स्प्रेस या उद्योग समुहाचा मालक आहे. त्या व्यक्तीचे नाव आहे जैक मा…

जैक मा यांचा जन्म १५ ऑक्टोंबर १९५४ला चीन मधील Hangzhou या भागात झाला. त्याचे मूळ नाव मा युन हे आहे. तो ज्या काळात मोठा झाला तेव्हा कम्युनिष्ट चीन बाकी देशापासून वेगळा होता. जैकच्या घरची परिस्थिती बेताची होती. लहानपणी त्याला विविध किडे जमा करायचा छंद होता. तो जमा करायचा आणि त्या किड्यामध्ये भांडण लावत असे. किड्याच्या आवाजावरून तो कोणत्या प्रकारचा किडा आहे हे ओळखत असे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निक्सन यांच्या Hangzhou येथील दौऱ्यानंतर हे क्षेत्र एक पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध झाले. जैक या काळात गाईडचे काम करू लागला तेव्हा तो इंग्रजी सुध्दा शिकला. याच काळात मा युन हा मुलगा ‘जैक’ म्हणून ओळखल्या जाऊ लागला. त्याला हे नाव एका पर्यटकाने दिले आहे.

हायस्कूल नंतर जैकनि विद्यापीठात प्रवेशा करिता २ वेळेस अर्ज केला परंतु तो प्रवेश परीक्षा नापास झाला. अनेक पर्यन्तनंतर त्याला Hangzhou Teacher’s Institute मध्ये दाखला मिळाला आणि त्याने तिथे पदवीचे शिक्षण पूर्ण केले. इन्टरनेट वर जैक ने पहिला शब्द जो शोधला तो आहे “बियर” त्याचा लक्षात आले चायनीज बियर हि इन्टरनेट वर मिळत नाही. तेव्हा त्याने ऑनलाईन बियर कंपनी सुरु करायचा निश्चय केला.

जैकचे दोन प्रयत्न वाया गेले. परंतु त्याने आपल्या १७ मित्रासोबत ‘अलीबाबा’, एक Online Marketplace हि वेबसाईट सुरु केली. विदेशी एक्स्पोर्ट कंपनीना तो आपल्या वेबसाईट वर विक्रीची सुविधा देतो. लोक सरळ याच वेबसाईटवरून ठोक भावात खरेदी करतात. हि कंपनी जोराने वाढण्यास सुरवात झाली आणि अक्टूबर 1999 मध्ये या कंपनीने Goldman Sachs कडून ५ मिलियन डॉलर आणि SoftBank कडून २० मिलियन डॉलर कमविले.

जैकची विशेषतः हि आहे कि तो कंपनीचे वातावरण अतिशय फ्रेंडली ठेवतो. विविध भेटवस्तू कर्मचार्याना तो सतत देत असतो. जैक आपल्या कंपनीच्या कार्यक्रमात नेहमी काहीतरी वेगळ करतो. आणि अलिबाबा हे नाव त्याने ‘अलीबाबा और 40 चोर’ या कथेतून घेतलेले आहे. जैकच्या आयुष्यावरून आपणास कळते कि कधीही स्वप्न सत्यात उतरू शकतात फक्त त्याचा पाठलाग करणे सोडू नका..

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *