पुण्यात गेले तर ह्या २३ गणपती मंडळास अवश्य भेट द्या… भाग-२

पहिले ११ गणपति येथे बघा- पुण्यात गेले तर ह्या २३ गणपती मंडळास अवश्य भेट द्या… भाग-१

नातूवाडा मित्र मंडळ

४८ व्या वर्षात पदार्पण केलेले हे मंडळ दरवर्षी वैज्ञानिक देखावे सादर करतात. दरवर्षी मंडळातील कार्यकर्ते हा देखावा तयार करतात. यावर्षी भारतीय नौदलात सामील झालेली “आयएनएस विक्रांत” जहाजाची ३८ फुट उंच प्रतिकृती तयार केली आहे. ७ मिनिटाच्या देखाव्याच्या या सादरीकरणात वैज्ञानिक पद्धतीने जहाजावरील रॉकेट, विमानाची हालचाल पाहण्याजोगी आहे. स्कायलॅब, बॉम्बे हाय गॅस प्लान्ट, भारताची दक्षिण गंगोत्री मोहीम असे अनेक वैज्ञानिक देखावे मंडळाने सादर केले आहेत. नातूवाडा मित्र मंडळाचे देखावे बघण्यासाठी अनेक लोकांची गर्दी असते. मंडळातर्फे “झाडे लावा झाडे जगवा”, विद्यार्थ्यांसाठी वह्या वाटप अशी अनेक सामाजिक कामे मंडळाने केल्याची माहिती राहुल मांजरेकर यांनी दिली.

हत्ती गणेश मंडळ

सदशिव पेठेतील प्रसिद्ध गणपती मंडळ म्हणजे हत्ती गणपती मंडळ. १२१ वर्षात पदार्पण केलेल्या या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे मंडळातर्फे सादर केले जाणारे पौराणिक देखावे. मंडळातर्फे यावर्षी “जागरण-गोंधळावर” आधारित हलता देखावा असून ९ मिनिटाच्या देखाव्यात नवरदेव आपल्या पत्नीला पाच पाय-या उचलून जेजुरीच्या खंडोबाच्या गडावर जाण्याची प्रथा आहे हा देखावा यात साकारला आहे. तसेच यात जेजुरी गडावरील भंडारा उधळणाची दृश्ये दाखवण्यात आली आहे. गेल्यावर्षी भव्य गणेश महालात बाप्पा विराजमान झाला होता. तसेच मंडळातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हत्तीवर स्वार झालेली गणपतीची मूर्ती. या हत्तीवर वाघाने हल्ला केल्याने गणपतीने त्याच्यावर त्रिशूल रोखले आहे अशी हि गणपतीची मूर्ती आहे अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष श्याम मानकर यांनी सांगितले.

नातूबाग मित्र मंडळ

मंडळाचे यंदाचे ७१ वे वर्ष. पुण्यातील विद्युत रोषणाईचा राजा असे संबोधले जाणरे मंडळ म्हणजे बाजीराव रोडवरील नातूबाग मित्र मंडळ. यावर्षीही दरवर्षी प्रमाणे विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. पुण्यातील शिवशक्ती इलेक्ट्रोनिक डेकोरेटर्स यांनी यासाठी काम केले आहे. २२ हजार बल्ब आणि इलेक्ट्रिक रोप चा वापर यासाठी करण्यात आल आहे. शेवटच्या दिवशी गजरथात बाप्पाची मिरवणूक काढली जाते. गणेशजन्म, नृत्य स्पर्धा, भावगीत स्पर्धा असे अनेक कार्यक्रम मंडळातर्फे केले जातात अशी माहिती अमित कनक यांनी दिली.

गरुड गणपती मंडळ

नारायण पेठेतील या प्रसिद्ध गणशोत्सव मंडळाचे यंदाचे ७० वर्ष. पुण्यात गणेशोत्सव मिरवणूक असो वा विसर्जन यात पर्थम स्थान असते ते ढोल पथकांना. गणेशोत्सवात दिवस रात्र ढोल वाजवून कान मंत्रमुग्ध करणा-या ढोल पथकांना प्रोत्साहन देण्यासाठी या मंडळांनी या वर्षी २० बाय १५ चा भव्य ढोल तयार केला आहे. या ढोलात बाप्पा विराजमान झाला आहे. या आधी इतक्या मोठ्या आकाराचा ढोल कोणीही कधीही केलेला नाही त्यामुळे मंडळ लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड साठी हि या ढोलाची शिफारस करणार आहे. मंडळातर्फे अंध मुलांना जेवण, पूरग्रस्तांना मदत अशी अनेक सामाजिक कामे मंडळातर्फे केली जातात.
Laxmi Rd, Narayan Peth, Pune, Maharashtra 411030

नवजवान मित्र मंडळ

१९७३ साली स्थापन झालेले सदाशिव पेठेतील पौराणिक देखाव्यासाठी प्रसिद्ध असलेले मंडळ. यावर्षी मंडळात “तुर्णावर्त राक्षाचा वध” देखावा तयार केला आहे. भगवान बाल कृष्णाला मारण्यासाठी कंसाने आपला सहकारी तृणावर्त नावाचा राक्षस पाठवला होता. एके दिवशी यशोदे बरोबर खेळताना तृणावर्त राक्षासाने मोठ्या वादळाचे रूप घेऊन बाल कृष्णाला मारण्यासाठी आकाशात उचलून नेले. परंतु, थोड्या वेळाने कृष्णाने विशाल रूप घेऊन तृणावर्त राक्षसाचा गळा पकडून त्याला ठार मारले. हे दृश्य या देखाव्यात दाखवण्यात आले आहे. ६२ फुट उंच हा हलता देखावा पाहण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी होत आहे. गेल्यावर्षी “बजरंगबली कि जय” हा देखावा उभारण्यात आला होता. यात मुख्य आकर्षण होते ते ३० फुट उंच हलती हनुमानाची मूर्ती. मंडळातील ५ फुट उंच शाडूची मूर्ती असून मंडळातर्फे दत्तक विद्यार्थी, वारक-यांस अन्नदान, वह्या वाटप अशी अनेक सामाजिक करण्यात आल्याची माहिती मंडळाचे संदीप रोकडे यांनी दिली.

साईनाथ मंडळ ट्रस्ट

पुण्यातील सामाजिक देखाव्यासाठी आणि अनेक पारितोषिकांनी सन्मानित मंडळ म्हणजे साईनाथ मंडळ ट्रस्ट. यावर्षी मंडळातर्फे अवयवदानाचे महत्व सांगणारा “भेटूया पुन्हा ब्रेक नंतर” हा सामाजिक संदेश देणारा देखावा पाहायला साकारला आहे. १२ मिनिटाच्या या जिवंत देखाव्यात अवयवदान का करावे, त्याचे महत्व काय इत्यादी गोष्टीवर परामर्श करण्यात आला आहे. ५५ व्या वर्षात पदार्पण केलेल्या बुधवार पेठेतील या मंडळात गेल्यावर्षी लहान मुलांचे लैंगिक शोषण करणारा “सावधान बागुलबुवा आलाय” हा जिवंत देखावा साकारला होता. गेल्यावर्षी सामाजिक देखाव्यासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई तर्फे प्रथम पारितोषिक देण्यात आले. मंडळातर्फे वर्षभर सामाजिक कामे केली जातात, कागदी पिशव्या तयार कण्याचे प्रशिक्षण देणे, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक खर्च, मुलीना रोजगार उपलब्ध करून देणे अशी अनेक कामे केली आहेत.

सेवा मित्र मंडळ

४९ व्या वर्षात पदार्पण केलेल्या मंडळाने अनेक सामाजिक कामे केली आहे. यावर्षी “आरोग्य सेवेचे माध्यम जेनेरिक औषधे” या नावाचा सामाजिक संदेश देणारा देखावा साकारला आहे. १४ मिनिटाच्या माहितीपट आणि जिवंत देखाव्यात जैनारिक औषधे म्हणजे काय, त्याचे महत्व, ते किती स्वस्त दरात उपलब्ध असतात, भारतात हे जास्त प्रमाणत वापरले जात नाही, हि डॉक्टरांनी सहज उपलब्ध करून देयायला हवी, अशी औषधे लोकांना वेळीच मिळाली नाही तर काय होईल या सर्वांचे सादरीकरण यात करण्यात आले आहे. गेल्यावर्षी “अन्नाची नासाडी थांबवा” असा संदेश देणारा देखावा तयार केला होता. अशा सामाजिक देखाव्याबरोबरच सैनिकांच्या सन्मानाचे कार्यक्रम, अनाथालयाला मदत, तसेच अनाथश्रमातील मुलांना पुण्यातील मामाच्या गावाची सफर घडवणे अशी अनेक सामाजिक कामे केली आहे.

विश्रामबाग मित्र मंडळ

यावर्षी या मंडळामध्ये “तुकाराम ते आसाराम” असा सामाजिक संदेश देणारा जिवंत देखावा साकारला आहे. या जिवंत देखाव्यात पूर्वी जे महाराज होते ते सामाजिक प्रबोधन करायचे परंतु आताचे भोंदू महाराज स्वताच्या स्वार्थासाठी पैसे उकळतात, याचा गैरवापर करतात याच्यावर भाष्य असून आता पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या थोर पुरुषांनी जन्म घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे या वर भाष्य केले आहे. तसेच समाजात वाढणारी महागाई, बलात्कार इत्यादी गोष्टी वाढत आहे त्यासाठी हा देखावा तयार करण्यात आला आहे. गेल्यावर्षी “स्त्रीभ्रूणत्या” या विषयावर देखावा साकारला होता.
790, Vedacharya Phatak Guruji Rd, Perugate, Sadashiv Peth, Pune, Maharashtra 411030

पेरुगेट चौक मित्र मंडळ

सस्नेह नमस्कार,पेढे वाटून स्वागत करुया श्री गणरायाचे, करू साजरे वैभवशाली वर्ष सुवर्णाचे आल्या गेल्या, सग्या-सोय-याना मैत्रीचा सांगा झटपट येऊनही मांगल्याचा उत्सवमध्ये रंगा सुवर्णमयीन चौरंग मांडला, आता दुरुनी हि पाहावे गणेशसेवा करण्यासाठी उत्सफूर्त यावे.
वरील वाक्याच्या पंक्तीतून “पेरुगेट चौक” या नावाचा समावेश आहे. सुवर्णमहोत्व वर्षात पदार्पण केलेल्या मंडळाचा यंदाचा देखावा “भारतीयांनो सावध व्हा..रात्र वै-याची आहे” हा देखावा साकारला आहे. १३ मिनिटाच्या स्लाईड शो देखाव्यात सीमा प्रदेशाची माहिती दिली असून आपला देशाच्या सीमेलगत पाकिस्तान, बांग्लादेश, नेपाळ व अन्य पाच देशांच्या सीमा आहेत. हे देश आपल्या देशाला व्यापाराबाबत, तर सुरक्षेबाबत कसे अडचणीत आणतील याची माहिती दिली आहे. गेल्यावर्षी मंडळाने स्त्रीभ्रूणहत्या विषयावर स्लाईड शो सादर केला होता. तसेच त्यावेळी ज्या घरात १ मुलगी अपत्य आहे अशा १११ कुटुंबांचा सत्कार करण्यात आला होता शिवाय एका मुलीच्या नावावर शिक्षणासाठी रक्कम बँकेत जमा करण्यात आली आहे.

अरणेश्वर मंडळ, सहकार नगर, गवळीवाडा

पुण्यातील गवळीवाडा येथील हे प्रसिद्ध मंडळ. “नको अवहेलना स्त्रीजन्माची” या विषयावर सामाजिक संदेश देणारा जिवंत देखावा साकारला आहे. २२ मिनिट असलेल्या या देखाव्यात सुरुवातीला कॉलेज कट्टयावरील मुलींची चेष्टा, महिलावरील समाजात तसेच घरात होणारे अत्याचार, ग्रामीण भागातील बलात्कार आणि खून अशा विषयावर भाष्य असून झाशीची राणी, अहिल्याबाई होळकर, इंदिरा गांधी इत्यादी महिलांचे कर्तुत्व दाखवले आहे आणि शेवटी स्त्रियांनी सक्षम कसे व्हावे,तसेच महिलांना पुरुषांबरोबर आदर मिळाला पाहिजे अशी माहिती या देखाव्यात दाखवण्यात आली आहे. मंडळातर्फे दत्तक विद्यार्थी योजना त्याचबरोबर चिमुकल्यांकरिता मोफत शिशु मंदिर बांधण्यात आले आहे. मंडळातील गणपती मूर्तीचे यंदाचे २५ वे वर्ष आहे.

नागनाथपार सार्वजनिक गणपती मंडळ

सदशिव पेठेतील सर्वात जुने आणि १२१ वर्षात पदार्पण केलेले हे मंडळ. यावर्षी मंडळात राजहंस महाल बांधण्यात आला आहे. २५ बाय ३० च्या राजहंस महालात ८ राजहंस असून मंडळातील रिद्धी सिद्धीसह विराजमान असलेली पंचधातूची बाप्पाची मूर्ती सागवानी मंदिरात बाप्पा विराजमान झाला आहे. मूर्तिकार गिरीश यांनी तयार केलेली मूर्ती पाह्ण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होते. गेल्यावर्षी मंडळातील बाप्पा मयूररथात विराजमान झाला होता. मंडळातर्फे शिक्रापूर तालुक्यात दुष्काळग्रस्त गावांमध्ये पिण्याचे पाणी पोहचवण्यात आले, नेत्र चिकित्सा शिबीर तसेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी तातडीने वैद्यकीय सेवा पुरवणी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येते अशी माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष मिहिर करंदीकर यांनी दिली.

शनिपार मित्र मंडळ

१२१ वर्षात पदार्पण केलेल्या या मंडळाची स्थापना १८९२ साली झाली. यावर्षी मंडळात “संस्कृतीच्या पाऊलखुणा” या नावाचा संदेश देणारा देखावा साकारण्यात आला आहे. हा जिवंत देखावा असून एकूण २२ कलाकार यात काम करत आहेत. या देखाव्यात पुण्यातील वाढते प्रदूषण, रस्त्यातील खड्डे, तसेच हल्लीची तरुण पिढी वा संस्कृती बिघडत चालली आहे, बेकायदेशीर बांधकाम या सर्व विषयांवर भाष्य करण्यात आले आहे. गेल्यावर्षी मंडळात अमरनाथ येथील बर्फाचे शिवलिंग तयार केले होते. पुण्यात येणा-या वारक-यांना अन्नदान, झाडे लावा झाडे जगवा, तसेच स्वच्छ पर्यावरण आणि स्वच्छ परिसर ठेवण्यासाठी “पर्यावरण दक्ष पुरस्कार”, दिवाळीत किल्ले स्पर्धा, विद्यार्थ्यांना वह्या वाटप अशी अनेक कामे केली असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष विकास घोले यांनी दिली. तसेच रविवार पेठेतील अनमोल भारत मंडळाने साकारलेला “म्हैसासूर वध” देखावा साकारला आहे. गवारी आळी मित्र मंडळ येथे विद्युत रोषणाई केली आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *