इंडोनेशियाच्या नोटेवर गणपती बाप्पा…यामागचं कारण वाचून तुम्हाला अभिमान वाटेल !

इंडोनेशिया शब्दाची निर्मिति इंडस(इंडियन) अणि ग्रीक शब्द नेसोस (द्वीप)पासून झाली आहे. इंडोनेशिया है सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या देशांच्या यादित चौथ्या स्थानी आहे. इंडोनेशियाची लोकसंख्या तब्बल २३ कोटि आहे. इंडोनेशियात तब्बल १७५०८ द्वीप असून हां सर्वाधिक द्वीप असलेला देश आहे. येथे असलेल्या प्राणी अणि वनस्पतींमुळे खुप जैव विविधता बघायला मिळते. इंडोनेशियातल्या नागरिकांत मुस्लीम लोकांची संख्या खूप जास्त आहे. पण तरीही तिथं हिंदू धर्माची पाळंमुळंही खोल गेली आहेत हे त्या देशात गेल्यावर नक्कीच दिसतं. तिथं जवळ जवळ ८७% लोक हे मुस्लीम आहेत आणि फक्त ३% हिंदू लोकवस्ती आहे. एवढा फरक असूनही इंडोनेशियाच्या २०,००० च्या नोटेवर इंडोनेशियाचे क्रांतिकारक ‘की हजर देवान्तर’ यांच्या सोबत चक्क ‘गणपती बाप्पा’ विराजमान आहेत, हे बघून आश्चर्याचा मोठाच धक्का बसतो.

गणपतीला कला, शास्त्र आणि बुद्धीची देवता म्हणून मानलं जातं आणि इंडोनेशियावर जेव्हा डच लोकांच राज्य होतं त्यावेळी की हजर देवान्तर हे शिक्षणाचे आद्यप्रवर्तक होते. या दोन कारणांवरून दोघेही एकत्र नोटेवर दिसतात. नोटेची मागील बाजू बघितल्यास ही बाब खरी असल्याचं आपल्या लक्षात येईल. मागील बाजूस वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचं चित्र आहे.

लाल कृष्ण अडवाणी यांनी जेव्हा इंडोनेशियाला भेट दिली तेव्हा त्यांना हिंदू मुस्लीम यांच्यातला एकोपा बघून धक्का बसला होता. इंडोनेशियात खऱ्या अर्थाने दोन्ही धर्मातली दरी मिटलेली पाहायला मिळते. इंडोनेशिया आणि भारताचा व्यापारी संबंध खूप पूर्वीपासून चालत आला आहे मंडळी…आणि याच व्यापारी संबंधातून सांस्कृतिक देवाणघेवाण झाली.

एवढंच काय आपल्याकडील रामायणाचं तिथं वेगळं वर्जन पाहायला मिळतं. काही काळानं इंडोनेशियात मुस्लिम धर्म पसरत गेला, पण मूळची पूर्वापार चालत आलेली संस्कृती या बदलातही तग धरून राहिलीय.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *