गणेश उत्सवाविषयी तुम्हाला काही माहिती नसलेल्या खासरे गोष्टी नक्की वाचा..

गणेश उत्सव आणि महाराष्ट्र यांचे नाते अनेक वर्षापासून आहे. महाराष्ट्रात या सणास सार्वजनिक साजरा करण्यास सुरवात झाली. आणि आता हि परंपरा जगातील कानाकोपऱ्यात पोहचली आहे. महाराष्ट्र सोबत कर्नाटक आणि आंध्रप्रदेशांतील काही भागात हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. सगळे गणेश उस्तव साजरा करतात परंतु या बाबत काही माहिती नसलेल्या गोष्टी आपण खासरे वर बघूया..

भारतातच नाही तर नेपाळ मध्येही गणेश उत्सव साजरा केला जातो. २०१६ मध्ये एकट्या मुंबईत १३ हजार गणपती मंडळे होती. पुणे मध्ये एकूण ३००० गणपती मंडळ आहेत. एकट्या मुंबईत दरवर्षी घरी बसविल्या जाणाऱ्या बाप्पांची संख्या जवळपास १,५०,००० एवढी आहे. लालबागच्या राजाच्या मिरवणूक सर्वात जास्त वेळ चालते. सकाळी १० ला सुरु होणारी मिरवणूक दुसऱ्या दिवशी सकाळी अंतिम ठिकाणी पोहचते. मागील वर्षी गणेश मंडळानी पंडालचा केलेला विमा जवळपास ५५० करोड रुपयाचा होता. लालबागच्या राजाचा विमा तब्बल ५१ करोड रुपयाचा आहे. १३ लाख त्याचे प्रीमियम दरवर्षी भरल्या जाते.

पुणेमध्ये ५०० वर्कशॉप आणि ८०० लोक गणेश मूर्ती बनवायचे काम करतात. दरवर्षी तब्बल ७ लाख बाप्पाच्या सुंदर मुर्त्या हे लोक बनवतात. यातील काही बाप्पा युके आणि युएस मध्ये पाठविले जातात. गणपती बाप्पांना एकूण १०८ नाव आहेत. गणेश चतुर्थीला भगवान शंकरांनी गणपती हे सर्व देवाच्या वर आहेत असे वरदान दिले होते. भारता सोबत Thailand, Cambodia, Indonesia, Afghanistan, Nepal, आणि China मध्ये गणपती बाप्पाची मंदिर आहेत.

असे मानल्या जाते कि गणपतीची १०८ नावे उस्तवा दरम्यान घेतल्यास फलदायी ठरते. ह्या आहेत काही बाप्पाच्या माहिती नसलेल्या गोष्टी आपल्याला आवडल्यास नक्की शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *