सीता देवी: राणी ज्या प्रवासात सोबत घेत असे १००० साड्या वाचा काही खासरे गोष्टी

भारतात राज घराण्यांनी आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करण्याची कुठलीच कसर सोडली नाही. आज खासरे वर अश्याच एका राणी विषयी काही अपरिचित माहिती घेऊया. ज्यांची श्रीमंती आपल्या तोंडात बोट घालायला लावेल. एका प्रसिद्ध राजा सोबत प्रेमसंबंध एक विवादित दुसरे लग्न आणि दागिने हिरे यांच्या करिता अपार प्रेम, हॉलीवूड मधील लोका सोबत उठणे बसने थोडक्यात असे होते सीता देवी यांचे आयुष्य..

आंध्र प्रदेश पीठ पिरमचे राजा महाराजा सूर्यराव व महाराणी चीनम्मा यांच्या घरी सीता देवी यांचा जन्म १२ मे १९१७ला झाला होता. १९४३ साली बडोद्याचे राजे प्रतापसिंह राव गायकवाड यांची पहिल्यांदा सीता देवी यांच्या सोबत ओळख झाली तेव्हा सीता देवी यांना तीन मुले होती. परंतु पहिल्याच भेटीत दोघे एकमेकाच्या प्रेमात पडले. महाराजा सोबत लग्न करायला पहिले लग्न तोडणे आवश्यक होते त्यामुळे सीता देवी यांनी धर्म परिवर्तन केले आणि मुस्लीम धर्म स्वीकारला आणि पहिल्या पतीस तोड दिली आणि परत धर्मपरिवर्तन करून हिंदू धर्म स्वीकारला व महाराजा सोबत लग्न केले. लग्नानंतर त्यांचे नाव श्रीमंत अखंड सौभाग्यवती सीतादेवी साहिब गायकवाड़ हे झाले.

जगातील ८वि सर्वात श्रीमंत व्यक्तीची पत्नी सीता देवी आणि महाराजांचे अप्पर प्रेम त्यांनी आपल्या राजकोषातील अनेक हिरे दागिने त्यांना भेट म्हणून दिले. सीता देवी आणि प्रतापसिंह यांचे लग्न अनेक वादांना पुढे गेले सुखी आयुष्य जगण्यासाठी ते फ्रांसमध्ये मोनोको येथे स्थायिक झाले. अनेक प्रसिध्द हिरे त्यांच्याकडे होतेच एवढेच काय तर त्यांनी आपले सिगरेट होल्डर देखील हिर्याने सजविले होते.

राणी आपले केस नेहमी मागे बांधत असे कारण हे कि त्यांचे दागिने सर्वाना दिसायला हवे. राणीकडे तीन पदरी हिऱ्याचा हार होता जो जगप्रसिद्ध ‘Star of the South’ असणार्या १२८ कैरेट गुलाबी ब्राझिलियन हिर्याने मढविला होता व सोबत 8.53 कैरेटचा ‘English Dresden’ हीरा जोडलेला होता. फ़्रेंच कंपनी, Van Cleef & Arpels या जगप्रसिद्ध सोन्याचे दागिने बनविणाऱ्या कंपनी कडून त्यांनी आपली जीभ साफ करायचे यंत्र सोन्याचे बनविले होते. असे सांगण्यात येते कि मोनोको येथील त्यांच्या घरात माणिक मोती असलेले कारपेट देखील होते.

सीता देवी यांच्या करिता French Factory Saree & Co.हि कंपनी स्थापन करण्यात आली जी त्यांच्या मृत्युनंतर बंद करण्यात आली. सीता देवी 1000 फ़्रेंच शिफ़ॉन साडी घेऊन प्रवास करत असे त्या सोबत मैचींग जोडे आणि पर्स सुध्दा असे. १९५६ साली त्यांनी आपले दुसरे लग्न तोडले परंतु त्यांची शान शौक कमी नाही झाले. असे सांगण्यात येते कि आपल्या हौसी पूर्ण करण्याकरिता त्यांनी आपले काही दागिने विकले. सीता देवीच्या मुलाच्या आत्महत्येने त्या पूर्णतः तुटल्या आणि त्यांनी ४ वर्षात जीवन संपविले.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *