लग्नाआधीच या आमदाराची चक्क ‘नवरी’ पळाली..

लग्न हा प्रत्येक व्यक्तीसाठी अत्यंत महत्वाची गोष्ट असते. नवरदेव नवरी करिताच लग्न हा विषय आनंददायी उत्सुकतेचा नसतो तर समाजासाठी हि लग्न हा विषय उत्सकुतेचा असतो. आपण त्यामुळे लग्नासंबंधीच्या पॉजिटीव्ह निगेटिव्ह बातम्या नेहमी पाहतो. आता पर्यंत आपण लग्नाच्या ऐन घडीवरून नवरा नवरी पळून गेल्याच्या अनेक बातम्या आपण वाचल्या ऐकल्या असतील. पण आता पर्यंत हे प्रकार सामान्यांच्या बाबतीत घडले होते. आपण कधी विचार केला आहे का कि एखादया आमदाराची होणारी नवरी लग्नाच्या काही वेळा पूर्वी पळून गेल्याचे ऐकले नसेल. पण अशी घटना घडली आहे.

१२ सप्टेंबर रोजी एका आमदार महाशयांचे लग्न होते त्यासाठी सर्व तयारी झाली होती. आमदार महाशयांच्या लग्नाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यासोबत मान्यवर लोक हि उपस्थित राहणार होते. लग्नाच्या ३ ते ४ दिवस अगोदरच मुलगी पळून गेली आहे. हा किस्सा तामिळनाडूचे आमदार ईश्वरन यांच्या बाबत घडला आहे. त्यांचे लग्न काही दिवसावर आले होते आणि नवरी पळून गेली आहे. आमदार महाशय यांचे वय ४३ तर भावी नवरीचे वय २३ होते. ती आपल्या प्रियकरासोबत पळून गेली असावी असा अंदाज व्यक्त केल्या जातो आहे.

आपल्या बहिणीकडे जाते म्हणून मुलगी घरातून निघालेली पण ती बहिणीच्या घरी काही पोहचली नाही आणि ती आपला प्रियकर विघ्नेश याच्यासोबत पळून गेली असावी. मुलीच्या आई ने पोलिसांकडे मुलगी बेपत्ता झाल्याची नोंद केली आहे. या प्रकारामुळे आमदार महोदयांना लग्न रद्द करावे लागले.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *