पारशी लोकांमध्ये कशाप्रकारे केला जातो अंत्यविधी? वाचा खासरेवर..

माणसाच्या जीवनात जन्म आणि मृत्यू या न चुकणाऱ्या गोष्टी आहेत. प्रत्येक माणसाला या दोन गोष्टींमधून जावेच लागते. जन्म नंतर मृत्यू हि क्रिया घडतेच. माणूस वेगवेगळ्या धर्मात बंधिस्त आहे. त्यामुळे अंतिम संस्काराच्या हि मुख्यत्वे दोन परंपरा आहेत. एक शरीराला जाळले जाते दुसरी दफन केले जाते. पण पारसी धर्मामध्ये एक वेगळीच परंपरा आहे. यापरंपरेत मृत माणसाच्या देहाला जाळत हि नाहीं न त्याचे दफन हि केले जात नाही तर यात शरीराला तसेच ठेवले जाते.

पारसी धर्म हा ३ हजार वर्ष जुना धर्म आहे आणि या धर्मात आज हि ३ हजार वर्षांपासूनच्या परंपरा पाळल्या जातात. पारसी समाज आज हि ३ हजार वर्षांपासूनची अंतिम संस्काराची क्रिया पाळत आली आहे. पारसी समाजात दोखमेनाशिनी असे या क्रियेला म्हणतात. माणूस मृत झाला कि त्याच्या शरीराला दोखमेनाशिनी या अंतिम क्रियेमार्फत शरीराला एकांतात नेले जाते ज्या ठिकणी अनेक गिधड असतात व ते गिधाड त्या शरीराला खाते. हा एक भंयकर प्रसंग आज पर्यंत सुरु आहे..

जगभरात असलेल्या पारसी धर्मियांपैकी सर्वाधिक पारसी मुंबई येथे राहतात. आणि मुंबई मधील पारसी बांधवांची स्वतंत्र स्मशान भूमी आहे त्या ठिकाणाला टॉवर ऑफ साइलेंस असे म्हटले जाते. या ठिकाणी पारसी बांधवांच्या मृत शरीराला आणून ठेवले जाते आणि मग गिधाड येऊन ते शरीर खातात. व त्यांच्यामते त्यांना मुक्ती मिळाले. हि स्मशान भूमी पूर्वी अत्यंत शांत भागात असायची पण शहरीकरणाने आता तिची शांतता भंग झाली आहे. तसेच गिधाड व इतर पक्षी अर्धवट मृत्यदेह खात असल्याने त्यांची दुर्गंधी सुटते त्यामुळे जवळपास च्या रहिवाशी लोकांची पण तक्रार या विरुद्ध आहे.

पण पारसी समाजाच्या अंत्यविधीला अडचणी निर्माण होत आहेत. कारण गिधाड हा पक्षी आता लुप्त होत आहे आजच्या घडीला गिधाडांची संख्या अत्यंत कमी झाली आहे २००७ मध्ये १०० च्या कमीच गिधाड राहिले आहेत असे नोंदवले होते. त्यामुळे पारसी समाजात सध्या अंत्यविधी साठी वेगळा पर्याय शोधावा लागतो आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *