आइसलँड येथील मुलींशी लग्न करा व ३ लाख रुपये महिना मिळवा ?

सोशल मीडियावर एक बातमी प्रचंड प्रमाणात वायरल झाली आहे. आपण हि ती बातमी पाहून आपल्या सिंगल मित्राला पाठवून त्यांची टिंगल सुद्धा केली असेल. बातमी होती आइसलँड येथील सरकारने अशी घोषणा केली आहे कि त्यांच्या देशातील मुलीसोबत एखादया परदेशी मुलाने लग्न करून त्याठिकाणी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला तर सरकार त्या मुलाला आयुष्य व्यथित करण्यासाठी ३ लाख ३३ हजार रुपये देईल. हि बातमी जगभर वायरल झाली आपण हि बातमी वाचली असेल. या बातमी मागील वायरल सत्य काय आहे याचा शोध आम्ही घेतला आहे.

या वायरल बातमी मध्ये आइसलँड येथे मुलींची संख्या मुलांपेक्षा अधिक वाढली आहे असा दावा करण्यात आला आहे. आणि लग्नासाठी यादेशातील मुली बाहेरील देशातील मुलांशी फेसबुक इंस्टाग्राम इत्यादी सोशल मीडिया माध्यमातून संपर्क साधत आहेत असेही सांगण्यात आले होते तसेच त्या लग्न करणाऱ्या मुलांना आइसलँड चे मोफत नागरिकत्व सुद्धा देण्यात येणार हे सांगितले होते. त्यामुळे सिंगल असणाऱ्या मुलांनी बॅग भरून लवकर आइसलँड ला जावे असे लिहिले होते. तर पाहूया काय आहे सत्य

जगभरातील बातमीच्या सत्यतेची खात्री करणारी एक snopes .com नावाची वेबसाईट आहे. ती खोट्या फेक बातम्यांचा पर्दाफाश करत असते. आईसलंड येथील सरकाराच्या घोषणेबाबत त्यांनी खात्री करून माहिती घेतल्यावर वायरल होणारी बातमी फेक असल्याची माहिती समोर आली आहे. कारण आइसलँड येथे १००० स्त्रियांच्या मागे १००७ पुरुषांची संख्या आहे त्यामुळे वायरल होणाऱ्या बातमी मधील दावे फोल ठरतात. हि बातमी सर्वात पहिले एका ब्लॉगर ने आपल्या ब्लॉग वर लिहिली होती त्या ब्लॉग ची खात्री न करता अनेक माध्यामांनी ती बातमी पुढे छापली.

खरेतर आइसलँड अत्यंत सुंदर देश असून तो तेथील थंडी साठी प्रसिद्ध आहे. पर्यटनासाठी या देशाला जगभरातून पसंती आहे. पण या वायरल बातमीमुळे त्या देशातील लोकांना नाहक मनस्ताप झाला. तर आइसलँड च्या मुलींच्या नावाने नायजेरिन फ्रॉड लोकांनी अकाउंट बनवून हजारो लाखो लोकांना फसवणूक करून लुटले. आइसलँड येथील सरकारने हि या बातमी बाबत खुलासा करून फेक असल्याचे सांगितले आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *