लहानपणी कचरा वेचायचा हा मुलगा, आज आहे जगातील सर्वात धडाकेबाज क्रिकेटर..

भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात लोकं क्रिकेटसाठी दिवाने आहेत. क्रिकेट म्हणलं की सर्वांच्या अंगात एक वेगळाच उत्साह संचारतो. क्रिकेट हा चाहत्यांसाठी एकप्रकारे धर्मच बनला आहे. क्रिकेटची सुरुवात झाल्यापासून क्रिकेट विश्वावर सुरुवातीला वेस्ट इंडिज आणि नंतर ऑस्ट्रेलियाने बरेच दिवस अधिराज्य गाजवलं. पण नंतर हे बदलत गेलं. प्रत्येक टीममध्ये आपले काही आवडते खेळाडू असतात. काही खेळांडूनवर तर जगभरातील चाहत्यांकडून प्रेम मिळतं. क्रिकेटर खेळाडूंचे राहणीमान खूप स्टायलीश असते. पण बऱ्याच क्रिकेटरनी इथे पोहचायला खूप मेहनत घेतल्याचे अनेक उदाहरणे आहेत. जगभरात आज क्रिकेट सगळीकडे पोहोचलंय. भारतात याचं क्रेझ मोठ्या प्रमाणात आहे. आज क्रिकेटमध्ये अनेक युवा आपलं करिअर करण्यासाठी येत आहेत. क्रिकेटमध्ये आज प्रसिद्धी शिवाय पैसा देखील मोठ्या प्रमाणात आहे. आज आपण एका अशाच क्रिकेटर बद्दल जाणून घेणार आहोत जो एकेकाळी आपल्या कुटुंबासाठी कचरा आणि प्लास्टीक वेचायचा. अनेक अडचणींमधून आज तो जगभरात मोठा क्रिकेटर बनला आहे.

कोण आहे तो खेळाडू-

हा क्रिकेटर आहे आपल्या धडाकेबाज फलंदाजीने क्रिकेट चाहत्यांना मंत्रमुग्ध करणारा वेस्ट इंडिजचा धडाकेबाज क्रिकेटर ख्रिस गेल. गेलचा जन्‍म २१ सप्टेंबर १९७९ मध्ये किंग्‍स्‍टन जमैकामध्ये झाला होता. आज क्रिकेटच्या जगतात ख्रिस गेलचं मोठं नाव आहे. आज त्याचं अलिशान घर आहे, अफाट पैसा आहे पण इथपर्यंत पोहचण्यासाठी त्याने अनेक अडचणींचा सामना केला आहे. ख्रिस गेलचा जन्म अत्यंत गरीब कुटुंबात झाला होता. त्यामुळे गेलने त्याच्या जीवनात खूप वाईट दिवस देखील पाहिले आहेत.

गेल एका छोट्याशा घरात राहत होता. घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे शिक्षण देखील त्याला घेता आलं नाही. त्याच्या वडिलांकडे शाळेच्या फी भरण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते. एकदा त्याने आपल्या लहानपणीच्या आठवणी सांगताना एका मुलाखतीत म्हटलं होतं की, आपल्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी तो कचरा देखील वेचायचा. कचरा आणि प्लास्टिक गोळा केल्यावरच त्यांचं कुटुंब चालायचं. लहानपणी एवढ्या अडचणी होत्या मी दोन वेळचं जेवणही मिळायचं नाही, असे त्याने सांगितले होते.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *