लंडन मधील राहुल गांधींच्या सभेत देशविरोधी नारे कोणी दिले ?? व्हिडीओ मागील वायरल सत्य

सोशल मीडियावर अनेक राजकीय पक्ष एकमेकांच्या विरोधात वेगवेगळ्या पोस्ट टाकून अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न करत असतात. अशातच एक व्हिडीओ फेसबुक ट्विटर वर वायरल होत आहे. हा व्हिडीओ काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या इंग्लंड येथील दौऱ्याशी संबंधित आहे. इंग्लंड येथील चार दिवसाच्या दौऱ्यात राहुल गांधी अनेकांशी भेटले. अनेक बैठकी सभा घेतल्या. अशाच एका राहुल गांधी यांच्या बैठकीमध्ये तीन खलिस्तानी युवक हे हिंदुस्थान मुर्दाबाद च्या घोषणा देताना एका व्हिडीओ मध्ये दिसत आहे. या व्हिडीओ मागील सत्य काय आहे याचा शोध आम्ही घेतला आहे.

मनोज कक्कर या व्यक्तीने हा व्हिडीओ आपल्या अकाउंट वर उपलोड केला असून त्या व्हिडीओ मध्ये हिंदी मध्ये “लंदन में राहुल गांधी के सभा में पहुँचे बेरोजगार खालिस्तानी आतंकवादी, कांग्रेस पार्टी जिंदाबाद और हिंदुस्तान मुर्दाबाद के नारे लगाये।” असा मेसेंज टाकून एक व्हिडीओ वायरल केला त्या व्हिडीओ ला तब्बल १६ हजार लोकांनी शेअर केले असून अत्यंत वायरल झाला आहे. या व्हिडीओ मुळे काँग्रेस व राहुल गांधी यांच्या बाबत नाकार्थी मत तयार होत आहे.

या व्हिडीओ ची हि आहे सत्यता..

लंडन येथील रायस्लीप येथे २५ ऑगस्ट रोजी राहुल गांधी यांची इंडियन ओवरसीज कांग्रेस यूके मेगा कॉन्फ्रेंस ठेवण्यात आली होती. या कॉन्फरन्स मध्ये तीन खलिस्तानी युवक येऊन बसले होते त्याठिकाणी राहुल गांधी यायच्या अगोदर त्या युवकांचे आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे शाब्दिक भांडण झाले. त्या भांडणांनंतर तात्काळ स्कॉर्टलँड यार्ड पोलीस घटनास्थळी आले आणि त्यांनी त्या युवकांना ताब्यात घेतले.

तेव्हा त्या युवकांनी खलिस्तान जिंदाबाद हिंदुस्थान मुर्दाबाद च्या घोषणा दिल्या त्याला प्रतिउत्तर म्हणून राहुल गांधी समर्थकांनी हिंदुस्थान जिंदाबाद ,काँग्रेस जिंदाबाद, राहुल गांधी जिंदाबाद च्या घोषणा दिल्या. जे कोणी व्यक्ती देशविरोधी घोषणा देत होते त्यांच्या राहुल गांधी यांच्याशी कोणताही संबंध आलेला नाही. हा प्रकार राहुल गांधी सभास्थळी येण्याअगोदर झाला होता. म्हणून वरील व्हिडीओ जरी बरोबर असला तरी त्या व्हिडीओ सोबत चा मेसेंज हा दिशाभूल करणारा आहे असे आढळून आले.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *