या फोटोतील साप शोधून तर दाखवा ! सोशल मीडियावर वायरल झालंय हे नवीन चॅलेंज…

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही.नवनवीन चॅलेंज सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्रेंडिंग मध्ये येताना दिसत आहेत. नुकतेच आलेल्या किकी चॅलेंजने तर सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. या चॅलेंजद्वारे सोशल मीडियावर अनेकदा वेगवेगळी कोडीही व्हायरल होतात आणि मग त्याचे उत्तर शोधण्यासाठी नेटीझन्समध्ये एकच स्पर्धा लागते. साप शोध,मांजर शोधा याप्रकारचे कोडे वायरल होतात. यामध्ये वाळलेल्या पानांतील साप शोधायला सांगितलेला असतो, तर काही वेळा आणखी काही वेगळ्या प्रकारची कोडी दिलेली असतात. नुकतेच असेच एक कोडे सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये दोन टेबल आहेत आणि त्यावर असलेले कुशन हे वेताच्या मटेरियलचे असल्यासारखे दिसत आहे. त्या दोन्ही कुशनवर काही मासिके ठेवण्यात आली आहेत. तसेच या कुशनचा कलर हा सापासारखा वाटत असल्याने आपल्याला साप शोधण्यास अडचण येईल.

ऑस्ट्रेलियातील सनशाईन कोस्ट स्नेक कॅचर्स २४/७ यांनी ही इमेज आपल्या फेसबुक पेजवर अपलोड केली आहे. आता हे दोन्ही टेबल आणि त्याखाली असलेली जमिन यावर सहजासहजी साप दिसणे कठीण आहे. यामध्ये साप कुठे दिसतो ते शोधा असे हे कोडे आहे.

तुम्हीही खाली दिलेल्या फोटोमधून साप शोधण्याचा प्रयत्न करू शकता.

जे हा साप शोधून काढतील त्यांना जास्तीचे पॉईंटस देण्यात येणार आहेत असेही या चित्राखाली म्हटले आहे. या चित्रातील साप शोधण्याचा अनेकांनी प्रयत्न केला असून त्यावर विनोदी अशा प्रतिक्रियाही नोंदवल्या आहेत. मात्र अद्याप अनेकांना हा साप नेमका कुठे आहे ते शोधता आलेले नाही. त्यामुळे पाहा बरं प्रयत्न करुन तुम्हाला हा साप शोधता येतो का ते…

तुम्हाला साप सापडलाच नाही तर त्याचे उत्तर देखील बघून टाका..

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *