श्रीकृष्णाच्या यदु कुळाचा नाश कसा झाला ??

महाभारत कौरव आणि पांडवांच्या युद्धात प्रचंड जीवित हानी झाली. या युद्धात १०० कौरव बंधूंचा अंत झाला तर पांडवांकडील ५ [पांडव सोडून त्यांच्याही मुलाबाळांचा अंत झाला. महाभारतातील युद्धात अत्यंत रक्त संहार झाला. युद्धाच्या समाप्ती नंतर युधिष्टिर याचा इंद्रप्रस्थ च्या सिंहासनावर राज्याभिषेक झाला. त्या प्रसंगी श्रीकृष्णाची पण उपस्थिती होती. श्रीकृष्णांनी गांधारीचे सांत्वन करण्यासाठी ते गांधारी ला भेटायला गेले. गांधारीला आपल्या १०० पुत्राच्या मृत्यूमुळे प्रचंड शोक झाला होता. श्री कृष्ण जेव्हा तिच्या जवळ गेले तेव्हा तिने युद्धाला जबाबदार श्रीकृष्णाला ठेवले आणि तिने श्रीकृष्णाला शाप दिला कि तिच्या पुत्राचा नाश भावाभावातील लढाई मध्ये झाला तसाच नाश श्रीकृष्णाच्या यदुवंशाचा हि होईल.

श्रीकृष्णाला हा शाप दिल्या नंतर यदुवंशाचा आता नाश होणार हे त्यांना समजून आले. द्वारके मध्ये यदुवंशी अत्यंत गर्विष्ठ बनले होते त्यांच्यात अत्यंत अंहकार भरलेला होता. ऋषीमुनीची टिंगल करणे सज्जन व्यक्तींना त्रास देणे. असा प्रकार ते करायचे त्यामधून एकदा दुर्वासा ऋषींची टिंगल करण्यासाठी श्रीकृष्ण पुत्रांनी आपल्या एका भावाला स्त्रीचा वेष करून दुर्वासा ऋषींकडे पाठवले व त्यांची टिंगल करण्याच्या उद्देशाने त्याने दुर्वासा ऋषीला म्हटले कि आपण गरोदर आहे आणि आपल्याला मुलगा होईल कि मुलगी ? तर दुर्वास ऋषींनी त्यांना शाप देत सांगितले कि याच्या पोटी लोखंडी मुसळ होईल आणि त्याच मुसळ द्वारे यदुवंशांचा आपसात लढाई होऊन नाश होईल.

या घटनेनंतर मुसळ निर्माण झाले आणि त्या मुसळाद्वारे आपल्या वंशाचा नाश होईल म्हणून त्या मुसळ चे बारीक तुकडे करून समुद्रात फेकून दिले. द्वारकेत एका उत्सवात यदुवंशी मद्याच्या आहारी जाऊन एकमेकात भांडत होते आणि त्यांच्या हाती समुद्री गवत आले त्या गवताच्या बुध्याला मुसळाचे घटक होते आणि त्या गवताच्या मारामुळे यंदुवंशीचा आपसात नाश झाला. त्यानंतर श्रीकृष्णाने सांगितले कि आता द्वारका नगरी समुद्राखाली जाईल तेव्हा द्वारका नगरी मधील लोकांनी इंद्रप्रस्थ कडे कूच केली.

श्रीकृष्ण मात्र तिथे सोमनाथ येथील जंगलात राहिले. एका वृक्षाखाली ध्यान करताना शिकाऱ्याने हरीण समजून त्यांच्या पायाला बाण मारला व यात त्यांचा मृत्यू झाला. धार्मिक मान्यतेनुसार तो शिकारी हा पूर्वी जन्मीचा बाली होता ज्याला रामायणात प्रभू रामाने चोरून बाण मारून मृत्युमुखी पाडले होते त्याचा बदला पूर्ण करण्यासाठी त्या शिकाऱ्याच्या बाणाद्वारे श्रीकृष्णाने आपला मृत्यू स्वतः ओढवून घेऊन अवतार कार्य समाप्त केले. अशा प्रकारे श्रीकृष्णाच्या यदु कुळाचा नाश झाला पण अशीही मान्यता आहे कि श्रीकृष्णच्या ज्या सुना गरोदर होत्या त्यांच्या पासून पुन्हा यादव कुळ पुन्हा वाढले.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *