केरळच्या पूरग्रस्तांचे सामान चोरताना पकडले RSS चे कार्यकर्ते?

केरळमध्ये पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी हजारो हाथ पुढे आले. केरळच्या नागरिकांसाठी देशातूनच नाही तर परदेशातून सुद्धा मदतीचा ओघ सुरू झाला. पण अशातच एक माहिती अशी समोर आली की केरळच्या पुरानंतर तिथे मस्त करण्यासाठी आलेल्या काही RSS च्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. ज्यांची संख्या तब्बल 48 असल्याचे बोलले जात आहे. या अटकेचे फेसबुक पोस्ट दिसत आहेत. याचा एखादा फोटो पण या पोस्टमध्ये दिलेला नाहीये. जे फोटो दिलेले आहेत ते आहेत चेन्नईचे. यामध्ये बोलले जात आहे की चेन्नईमध्ये संघाचे कार्यकर्ते पकडले आहेत आणि पोलिसांनी त्यांना मारहाण सुद्धा केली आहे. या कार्यकर्त्यांना दागिने चोरी करताना पकडले गेले. पण यामध्ये खरंच सत्यता आहे का? खासरेवर जाणून घेऊया यामागचे व्हायरल सत्य..

केरळमध्ये या घटनेविषयी माहिती घेतली असता अशा प्रकारची कोणतीही घटना घडली नसल्याचे समोर आले आहे. याविषयी करण्यात आलेल्या पोस्ट या पुरावा न देता करण्यात आल्या होत्या. फेसबुक द्वारे पसरवण्यात आलेली ही एकप्रकारे अफवा असल्याचे समोर आले आहे.

पण यामध्ये चेन्नईत अटक झाल्याचे सांगून व्हायरल झालेल्या फोटो मध्ये काय सत्यता आहे जाणून घेऊया. एका व्यक्तीची कॉलर पकडून पोलीस उभे आहेत. पण हा देखील फोटो जुना असल्याचे समोर आले आहे. हा फोटो 11 नोव्हेंबर 2012 चा असून तो दैनिक जागरण मध्ये छापला गेला होता. हा फोटो चेन्नई किंवा केरळचा नसून तो आग्रा चा आहे. 2012 मध्ये स्वयंसेवकांनी एक सायकल यात्रा काढली होती. ज्यामध्ये एका सायकलस्वाराला स्कॉर्पिओ गाडीने धडक दिल्यानंतर तेथील परस्थिती हाथाबाहेर गेली आणि पोलिसांनी लाठीचार्ज केला होता.

2015 मध्ये सुद्धा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामधील एका फोटोमध्ये तर ABP न्यूज चा पण लोगो वापरण्यात आला आहे. पण यामध्ये जो लोगो आहे तो ABP न्यूजचा जुना लोगो आहे. मग आता चेन्नईत RSS चे कार्यकर्ते पकडले तर ABP न्यूज चा जुना लोगो असलेल्या फोटो कसे काय पोस्ट केले जात आहेत. त्यामुळं तुम्ही सुद्धा काही माहिती आली तर ती पुढे पाठवण्याच्या अगोदर पडताळून बघत जा.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *