वृधाश्रमात आजी सोबत रडणाऱ्या या मुलीच्या फोटो मागची कथा नक्की वाचाच..

सोशल मीडियावर अनेक प्रकारचे मेसेज वायरल होतात असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड वायरल होत आहे. त्या फोटो मागील काय आहे वायरल सत्य हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. हा फोटो एक आजीबाई आणि छोट्या मुलीचा फोटो आहे. त्या फोटो वर A school organised a tour to an old age home and this girl found her grandmother there.When she used to ask her parents about whereabouts of grandma, she was told that she has gone to meet her relatives.This is the society we are creating… हा इंग्लिश मेसेंज लिहिलेला आहे. याचा मराठी मध्ये अर्थ एका शाळेने आपल्या विद्यार्थ्यांची टूर एका वृद्धाश्रम मध्ये आयोजित केली होती. या फोटो मधील मुलीला या वृद्धाश्रम मध्ये तिची आजी भेटली होती. तिने आपल्या पालकांना आजीबद्दल विचारले तेव्हा त्यांनी आजी नातेवाईकांना भेटायला गेली असे सांगितले होते. समाज कुणीकडे जात आहे ??

हा फोटो इंग्लिश हिंदी मध्ये मजकूर लिहून प्रचंड प्रमाणात वायरल होत आहे. हा फोटो ट्विटर वर अंबालिका कृष्णप्रिया हॅण्डल ने ट्विट केला आहे त्याला ४ हजाराहून अधिक लोकांनी रिट्विट केला आहे. तर दिल्ली चे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल क्रिकेटर हरभजन सिंह सारख्या मोठ्या व्यक्तिमत्वाने हा फोटो रिट्विट केला आहे. त्यामुळे या फोटोची सत्यता शोधणे महत्वाचे ठरते.

या फोटोबाबत आम्ही अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर फेसबुकवर हा फोटो our vadodara या फेसबुक पेजने गुजराती आणि इंग्लिश मजकूर लिहून पोस्ट केल्याचे दिसले. त्या पोस्ट मध्ये वरील माहिती दिली होती कि हा फोटो २००७ साली काढण्यात आला होता आणि तो फोटो कल्पित भट्टाच्चा यांनी काढला होता. या घटनेला बीबीसी गुजरात आणि दिव्य भास्कर यांनी कव्हर केले होते. त्या फोटो बाबत फोटोग्राफर असणाऱ्या कल्पित भट्टाच्चा यांना विचारल्या नंतर त्यांनी संपूर्ण माहिती सांगितली.

हा फोटो १२ डिसेंबर २००७ रोजीचा आहे. अहमदाबाद येथील मणिनगर येथील गुरुनानक अँड चंन्द्रकेतु पंड्या स्कुल च्या विद्यार्थ्यांना शाळा प्रशासन मणिलाल गांधी ओल्ड एज होम मध्ये घेऊन गेले होते. तेव्हा शाळेतील सर्व विद्यार्थी वृद्धाश्रम मधील आजी आजोबाना भेटत होते. सर्व विद्यार्थ्यांना वृद्धाश्र मधील सर्व आजी आजोबांच्या सोबत ग्रुप फोटो काढण्यासाठी बोलावण्यात आले तेव्हा एक आजी एका मुलीला जवळ घेऊन रडत होत्या. त्याबाबत त्यांना विचारले कि हि मुलगी तुमची कोणी नातेवाईक आहे का तर त्या आजीने सांगितले कि हि मुलगी त्यांच्या मुलाची मुलगी आहे आणि ती त्यांची नातं आहे. त्या मुलीला विचारण्यात आल्यावर तिने सांगितले कि आजी चार दिवस झाले घरी नव्हती तर तिने तिच्या आईवडिलांना विचारले तर त्यांनी सांगितले कि आजी हि नातेवाईकांच्या कडे बाहेर गावी गेली आहे. पण त्या मुलीला आज आजी येथे वृद्धाश्रममध्ये भेटली. आजींना वृद्धाश्रम मध्ये का आलात याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले कि त्या स्वतःहून स्वखुशीने येथे आल्या आहेत. आणि त्या अजून हि त्या आश्रमात राहत असतात.

बीबीसी गुजरातीच्या प्रीत गराला यांनी शाळेच्या प्रिन्सिपल रतन पंड्या यांना या फोटो बाबत विचारले तेव्हा त्यांनी सांगितले कि आता हा फोटो टॉप दहा फोटो स्टोरी च्या प्रदर्शनात लागला होता. या प्रदर्शनातून हि फोटोस्टोरी पुन्हा वायरल झाली असावी असे त्यांनी सांगितले.

या फोटो मधील मुलीचे नाव भक्ती पांचाळ आहे ती अजूनही आपल्या आजीला भेटायला वृद्धाश्रम मध्ये नेहमी येते. या फोटो मधील आजीचे नाव दमयंती पांचाळ आहे. त्यांना बीबीसी गुजरातीच्या पत्रकारांनी विचारले तर त्यांनी पुन्हा सांगितले कि त्यांना येथे राहायला आवडते आणि त्या स्वखुशीने येथे राहायला आल्या आहेत. या फोटो बाबतची सत्यता तपासल्यावर समजते कि हा फोटो सत्य आहे परंतु हा फोटो ११ वर्ष जुना आहे. एकूणच या फोटोमधील भावनांमधून देशविदेशातील अनेक लोकांच्या डोळ्यातील कडा ओलावल्या असतील..

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *