दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर कुंडू यांचा शेवटचा विडीओ..

जम्मू-काश्मीरच्या राजौरी आणि पुँछ भागात पाकिस्तानने गोळीबार करत थेट मिसाईलने हल्ला केला आहे. यात एका कॅप्टनसह 4 जवान हुतात्मा झाले. 2 स्थानिकही या हल्ल्यात जखमी झाले आहेत. या मिसाईल हल्ल्यात वयाची 23 वर्ष पूर्ण होण्यास अवघे 5 दिवस असताना कॅप्टन कपिल कुंडू यांना वीरमरण आले. हरियाणाचे (गुरुग्राम) सुपुत्र असलेले कॅप्टन कपिल हे 10 फेब्रुवारीला वयाची 23 वर्ष पुर्ण करणार होते.

कॅप्टन कपिल यांनी मृत्यूअगोदर त्यांच्या बहिणीसोबत whatsapp वर पाठविलेला विडीओ सध्या वायरल झाला आहे. ज्यामध्ये कॅप्टन कपिल हे आपल्या बहिणी सोबत बोलत आहेत आणि सोबत मांजर हि आहे. या विडीओ मध्ये कॅप्टन अतिशय खुश आहे. मृत्युपूर्वी त्यांनी हा विडीओ आपल्या बहिणी सोबत शेअर केला होता.

कॅप्टन कपिल यांनी फेसबुकवर ‘लाईफ शूड बी बिग, इंस्टेड ऑफ बीइंग लाँग’ हे याच आशयाचं लिहिलेलं स्टेटस याची प्रचिती देतं. याच्या अवघ्या २२ व्या वर्षी त्यांनी देशासाठी बलिदान दिले. ‘जिंदगी लंबी नही, बडी होनी चाहिए,’ असं कॅप्टन कुंडू नेहमी म्हणायचे आणि त्यानुसारच ते जगलेही. ‘आनंद’ सिनेमातील त्यांचा हा आवडता डायलॉग होता. हा डायलॉग त्यांनी त्यांच्या फेसबुक स्टेटसवरही ठेवला होता.

2012 मध्ये कॅप्टन कपिल कुंडू एनडीएमध्ये रुजू झाले. एनडीएच्या माध्यमातून ते सैन्यात दाखल झाले. सैन्याच्या 15 जॅकलाई युनिटमध्ये असलेले कॅप्टन कुंडू राजौरीमध्ये तैनात होते. ते मूळ हरियाणातील गुरुग्रामचे रहिवासी होते. वडिलांच्या मृत्यूनंतर कपिल हे आई सुनिता यांचा आधार झाले. त्यांच्या दोन्ही मोठ्या बहिणींची लग्न झाली आहेत. कपिल यांना काळाने हिरावल्यामुळे कुंडू कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जम्मू-काश्मीरच्या राजौरी आणि पुँछ भागात पाकिस्तानानं गोळीबाराबरोबरच थेट मिसाईलनं हल्ला चढवला. यात कॅप्टन कपिल कुंडूंसह चार जवान शहीद झाले आहेत. तर दोन स्थानिक नागरिकही जखमी झाले आहेत. नियंत्रण रेषेवर दोन्ही बाजूने गोळीबार झाला. 2017 साली पाकिस्तानने तब्बल 881 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केले होते.
कॅप्टन कपिल कुंडू यांना खासरे तर्फे मनाचा मुजरा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *