बघा कोण होणार मंत्री गिरीश बापट यांची सुनबाई…

भाजप नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांचे सुपुत्र गौरव लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये त्यांचा साखरपुडा पार पडला होता. सांगलीतील स्वरदा केळकर सोबत गौरव हे विवाहबद्ध होणार आहेत. स्वरदा या भाजपच्या राज्य उपाध्यक्ष नीता केळकर यांच्या कन्या आहेत तर स्वरदाचे वडील हे सांगलीत व्यावसायिक आहेत.

स्वरदा केळकर या स्वतःही भाजपच्या पदाधिकारी आहेत। त्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या उपाध्यक्ष आहेत. तसेच स्वरदा या सांगली-मिरज कुपवाड महापालिकेच्या विद्यमान नगरसेवक आहेत. राज्य सरकारने स्वरदा यांची बाल हक्क आयोगावरही नेमणूक केली आहे.

स्वरदा आणि गौरव यांची पुण्यातील डिईएस लॉ कॉलेजमध्ये ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झालं. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही कुटुंब एकाच पक्षाशी बांधिलकी असणारे आहेत त्यामुळे त्यांना घरून विवाहाला लगेच पाठिंबा मिळाला. स्वरदा आणि गौरव या दोघांनीही कायद्याचे शिक्षण घेतले आहे. कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याच्या अगोदरच दोघांची ओळख होती. आता ही ओळख नात्यामध्ये रूपांतरित होत असल्याने दोन्ही कुटुंबाकडून आनंद व्यक्त करण्यात येतोय.

स्वरदा यांच्या आई नीता केळकर यांनी आक्रमक नेत्या म्हणून ओळख आहे. स्वरदाही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून राजकारणात प्रगती करत आहेत. स्वरदा यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्याशी चांगली ओळख आहे. स्वरदा यांनी परदेशातही भाजपकडून विविध सेमिनारमध्ये प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी थोड्याच कालावधीत भाजपच्या तरुण फळीतील आक्रमक चेहरा अशी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी कमी वयातच अनेक आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नेहमीच स्वरदावर कौतुकाची थाप टाकली. स्वरदा आणि गौरव 25 फेब्रुवारीला पुण्यातील शुभारंभ लॉंन येथे विवाहबद्ध होणार आहेत. राज्याच्या विद्यमान मंत्र्याची सून यामुळे स्वरदा यांची राजकीय कारकीर्द चांगलीच बहरणार यात शंकाच नाही.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *