गुलाबी शहराविषयी सर्वाना माहिती आहे, पण तुम्हाला माहिती आहे का भारतातील हे निळे शहर…

गुलाबी शहराचं नाव आपण सर्व ऐकून आहोत. अनेक सिनेमात गुलाबी शहर जयपूरचं सौंदर्य दाखवण्यात आलेलं आहे. जयपूरचं सौंदर्य बघण्यासाठी लोकं दुरदुरुन येतात. विदेशातून अनेक पर्यटक येथे येतात. बऱ्याच पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू हे जयपूर शहर असते. परंतु तुम्ही कधी निळ्या शहराविषयी ऐकलं आहे का? निळ्या शहराविषयी माहिती नसेल तर आज आपण जाणून घेणार आहोत. या शहराला निळे शहर म्हणून ओळखलं जाण्याचं कारण म्हणजे या शहरात जास्तीत जास्त घरांचा कलर हा निळा आहे.

आपल्या देशातील हे निळं शहर आहे जोधपूर. चला तर जाणून घेऊया या शहराविषयी काही खासरे माहिती…

जोधपूरला का बोलले जाते निळं शहर-

राजस्थानातील जोधपूर हे निळे शहर आहे ज्याची निर्मिती जवळपास 558 वर्षांपूर्वी करण्यात आली होती. हे शहर सुद्धा खूप आकर्षक आणि सौंदर्याने नटलेलं आहे. या शहराला इथल्या रंगामुळे वेगळी ओळख मिळाली आहे. या शहराचा शोध 1459 मध्ये राव जोधाने केल्याचे बोलले जाते. जोधा हे राठोड समाजाचे प्रमुख आणि जोधपूरचे 15 वे राजा होते. त्यांच्या नावावरूनच या शहराचे नाव जोधपूर पडलं. यापूर्वी शहराचं नाव मारवाड होतं. हे शहरात वाळवंटात वसलेलं असल्याने गर्मीपासून बचावासाठी हे शहर निळं असल्याचे बोलले जाते.

सुर्यनगरी सुद्धा आहे नाव-

हे शहर सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी खूप आकर्षक दिसते. लोकांचं म्हणणं आहे की या शहरात सूर्यदेव जास्त वेळ थांबतात. यामुळे शहराला सूर्यनगरी नावाने सुद्धा ओळखले जाते. भव्य किल्ले, महाल, मंदिर, संग्रहालय आणि सुंदर बागा हे या शहराच्या सौंदर्यात अधिकची भर घालतात.

इथे झाली आहे अनेक सिनेमांची शूटिंग-

इथल्या सौंदर्यामुळे अनेक पर्यटक इथे नेहमी भेट देत असतात. पण बॉलीवूड आणि हॉलीवूड सुद्धा याच्या प्रभावापासून वाचले नाहीयेत. इथल्या ब्रम्हपुरीमध्ये अनेक सिनेमाचं शूटिंग झालं आहे. अनेक मोठ्या कंपन्यांच्या जाहिरातीचे शुटींगसुद्धा या शहरात होत असते. 20 वर्षांपूर्वी जंगल बुक या सुप्रसिद्ध हॉलीवूड सिनेमाची शुटींग झाली होती. बॉलीवूडचा शुद्ध देशी रोमान्स हा सिनेमा सुद्धा या शहरात शूट करण्यात आला होता.

मेहरानगढ किल्ला आहे इथली शान-

शहरातील मेहरानगढ किल्ला हा शहराची शोभा वाढवतो. समुद्रसपाटीपासून 125 मिटर उंच असलेला हा किल्ला सर्वात पुरातन किल्यांपैकी एक आहे. या किल्ल्याची निर्मिती 15 व्या शतकात जोधपूरचे 15 वे राजा जोधा यांनी केली होती. या किल्ल्यावरून शहराचे सौदर्य खूप चांगल्या प्रकारे अनुभवता येते.

जोधपूरचा गौरवशाली इतिहास-

या शहरातील ऐतिहासिक किल्ले, जुने महाल आणि प्राचीन मंदिर जोधपूरच्या गौरवशाली इतिहासाचे प्रतीक आहेत. या शहरातील हस्तशिल्प, लोकनृत्य, भोजन आणि संगीत हे शहराची शोभा वाढवतात.

तुम्ही गुलाबी शहर बघितले असेल तर आता वेळ आहे निळ्या शहराला भेट देण्याची. इथे तुम्हाला प्रत्येक गोष्ट निळीच दिसेल.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *