सर्वसामान्य मुले ते ‘लागीर झालं जी’ मधील सुपरस्टार, बघा लागीर झालं जी मधील कलाकारांचा प्रवास खासरेवर…

मराठी प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलेल्या लागीर झाल जी या मालिकेतील अनेक कलाकार प्रथमच प्रेक्षकांच्या सामोरे आले आहेत तर जाणून घेऊया खासरेवर आपण लागीर झाल जी मधील कलाकारांविषयी…

मालिकेतील लीडिंग अभिनेता म्हणून आज्या हे पात्र प्रेक्षकांच्या हृदयापर्यंत पोहचले आहे या अभिनेत्याचे नाव आहे नितीश चव्हाण नितीश चा जन्म ७ जुलै १९९० साली सातारा येथे झाला त्याचे शालेय शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल दापोली येथे झाल्यानंतर त्याने BCA ची डिग्री किसन वीर महाविद्यालय वाई येथे घेऊन पुणे येथे त्याने सनबीम इन्स्टिट्यूट मधून DACA हा डिजाईनचा कोर्स केला तसेच त्याने CDac चा कोर्स केला.

एवढे शिक्षण करून नितीशच्या मनात डान्सिंग बाबतीत प्रेम होते त्याला डान्स मध्ये काही तरी करायचे होते आणि त्याने आपले ते ध्येय निश्चित केले होते त्याने सातारा येथे येऊन स्वतःची NEXGEN नावाची डान्स अकादमी सुरु केली. नितीश ने अनेक नाटकात हि काम केले आहे. तसेच लोकल लेवल वर जाहिराती मध्ये हि काम केले पण त्याला लागीर झाल जी या मालिकेच्या माध्यमातून मोठी संधी मिळाली.मालिकेत एक सातारी फौजीची चे लीडिंग रोल असणारी भूमिका नितीश चव्हाण ला मिळाली आणि त्याने ती अत्यंत चांगल्या पद्धतीने केली. आज आज्या हे पात्र प्रत्येकाच्या हृदयापर्यंत पोहचले आहे आणि सामान्य नितीश चव्हाण मोठा स्टार बनला आहे.

शितली या नावाने संपूर्ण मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आपल्या शितलीचे नाव आहे शिवानी बावकर..शिवानीचा जन्म २९ ऑगस्ट १९९२ रोजी पुणे येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.शिवानी ला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती.त्यामुळे तिने मुंबई मध्ये येऊन अभिनय क्षेत्रात करिअर करायचे ठरवले. व नाटकांच्या माध्यमातून तिची इंट्री झाली.

शिवानी ने हिंदी आणि मराठी मालिकेत पण काम केले आहे. त्यापैकी अनामिका, देवयानी, सुंदर माझे घर तसेच तिचा पहिला चित्रपट दगडाबाई ची चाळ यातील भूमिकेसाठी तिला सिल्वर स्क्रीन अवार्ड पण भेटला आहे.महाराष्ट्र दिनाच्या औचित्य साधून लागीर झाल जी या मालिकेचे प्रसारण झाले त्या मालिकेत शिवानी ने जी गावरान अंदाज मधील एकदम निर्भीड मुलीची जी भूमिका केली तिला सर्व महाराष्ट्राने डोक्यावर घेतले. तिची आणि आज्याची प्रेमकहाणी महाराष्ट्रातील घराघरात पोहचली आणि शिवानी ला या मालिकेने स्टार बनवले.

राहुल्या म्हणजेच राहुल मगदूम हा लागीर झाल जी मालिकेतील विनोदी पात्र म्हणून सर्वपरिचित आहे. ‘मला लय कॉन्फिडन्स हाय’ हा त्याचा डायलॉग खूपच प्रसिद्ध आहे. राहुल चा जन्म २१ जानेवारी १९९१ साली उरून तालुका इस्लामपूर येथे झाला. त्याने कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज उरून येथून डिग्री घेतली. लागीर झाला जी या मालिकेच्या माध्यमातून राहुल घराघरात लोकप्रिय झाला.

मालिकेतील खलनायक भैयासाहेब याचे प्रत्येक्षातील नाव किरण गायकवाड आहे व त्याचा जन्म १२ जून १९९० सालचा पुणे येथील आहे.पण सध्या तो सातारा येथे राहतो. त्याचे शिक्षण यशवंतराव मोहिते कॉलेज पुणे येथे झाले आहे.किरणचा अभिनय प्रेक्षकाला आवडला. लागीर झाल जी माध्यमातून तो प्रथमच प्रेक्षकांसमोर आला आणि मोठा स्टार झाला.

विक्या विकास म्हणजेच निखील चव्हाण. हा मालिकेतील लीड रोल असनाऱ्या आज्याचा जिगरी मित्र त्याचा जन्म ३० मे १९९२ चा आहे तसेच तो प्रत्येक्षात अत्यंत देखणं व्यक्तिमत्व आहे. मुळचा पुण्याचा असणारा निखील लागीर झाल जी च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. जयडी हिचे नाव किरण ढाने असून ती सातारा येथील आहे प्रथमच ती लागीर झाल जी माध्यमातून पदार्पण करत आहे. लागीर झाल जी मधील हि काही कलाकार ज्यांच्या बद्दल हि थोडक्यात माहिती.
साभार भैया पाटील

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरु नका..

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *