भारतीय उद्योग जगताचे छोटे नवाब, 14 व्या वर्षी बनलेत करोडोंच्या कंपनीचे मालक…

माणसांमध्ये हिम्मत असेल तर कोणतेही काम करणे जगात कठीण नाही. आपल्या देशात अनेक असे प्रतिभावंत मुलं आहेत जे खूप कमी वयात यशाच्या शिखरावर पोहचून दुसऱ्यांसाठी आदर्श बनले आहेत. या मुलांनी सिद्ध केले आहे की प्रतिभाला वयाचे बंधन नसते. आज आपण अशाच दोन भावांच्या यशाची माहिती बघणार आहोत ज्यांचे वय कमी असल्याने त्यांच्या नावावर रजिस्टर नाही झालीये. परंतु त्यांच्या कौशल्यासमोर मोठे मोठे उद्योगपती नतमस्तक होतात. चला तर खासरेवर आज जाणून घेउया या 2 उद्योजक भावांबद्दल.

कोण आहेत हे दोन भाऊ?

खरंतर लहान भारतीय मुलांना आपण सुटाबुटमध्ये पाहिल्यानंतर सर्वांच्या मनात एकच विचार येतो की ते मुलं आपल्या आई-वडिलांसोबत एखाद्या कार्यक्रमात जात असतील किंवा कुठे फिरायला. परंतु हे श्रवण कुमारन आणि संजय कुमारन साठी लागू नाही होत. दोघे भाऊ अवघ्या 12 आणि 10 व्या वर्षीच करोडो रुपयांचा टर्नओव्हर असणाऱ्या कंपनीचे सीईओ बनले आहेत. चेन्नईमध्ये जन्मलेले श्रवण जेव्हा आठवीच्या वर्गात होते तेव्हाच त्यांनी आपला भाऊ दंजय जो की फक्त 6सहाव्या वर्गात होता, त्याच्यासोबत मिळून बऱ्याच मोबाईल अँपची निर्मीती केली आहे. कुमारन बंधूंना लहानपणीपासुनच कॉम्प्युटर मध्ये खूप रस होता. घरात आणि शाळेत गेल्यानंतर सुद्धा हे दोघे भाऊ कॉम्पुटर लॅबमध्ये कॉम्पुटरला चिटकून असायचे. दोघा भावांना कॉम्प्युटरवर गेम खेळण्याची सुद्धा खूप आवड होती. परंतु इतर मुलांपेक्षा वेगळे असणाऱ्या कुमारन बंधूनी स्वतःचा एक गेम बनवण्याच्या प्लॅन केला. नंतर दोघांनी एक कंपनी त्यासाठी चालू करण्याचे ठरवले, पण त्यांचे वय यासाठी अडचणीचे ठरले. नंतर त्यांनी आपल्या आईवडिलांच्या नावावर गो डायमेंशन नावाची कंपनी स्थापन केली. याच कंपनीच्या नावाने त्यांनी नंतर अँप बनवायला सुरुवात केली.

श्रवण सांगतो की ‘आम्हाला खेळण्यापेक्षा गेम बनवण्यात जास्त आवड होती. गेम कसे बनतात यामध्ये त्यांना जास्त कुतूहल होते. आपल्या गेम्सच्या आवडीला जपत त्यांनी सुरुवातीला कॅच मी कोप्स नावाचा गेम बनवला. या गेममध्ये एक चोर जेलमधून पळून जातो. 2012 मध्ये प्लेय स्टोर आणि एपल स्टोर ला आल्यानंतर हप्ताभरात या गेम ला 2000 पेक्षा जास्त लोकांनी डाउनलोड केलं. सुरुवातीच्या यशाने त्यांना अजुन ताकत दिली आणि त्यांनी नंतर कधीच मागे वळून नाही पाहिले.

कुमारन भावांची यशाची कहाणी-

तुम्ही ऐकून हैरान व्हाल की कुमारन भावांना पाहिले अँप लाँच करण्यासाठी जवळपास 125 अँपचे निरीक्षण करावे लागले होते. अँप बनवण्यासाठी त्यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यावेळी त्यांच्यासमोर मुख्य अडचण होती ती म्हणजे कमी साधनं उपलब्ध असताना अँप कसे डेव्हलप करावे. त्यांना आपला पहिला प्रॉडक्ट लोकांसमोर आणण्यासाठी अनेक महिने लागले होते. आतापर्यंत त्यांनी गो डायमेंशनच्या नावाखाली 10 पेक्षा जास्त अँपची निर्मिती केली आहे, जे की आतापर्यंत जवळपास 10 लाखांपेक्षा जास्त लोकांनी डाउनलोड केले आहेत. आपल्या आईच्या मार्गदर्शनाने त्यांनी अल्फाबेट बोर्ड आणि कलर पैलेट नावाचे 2 शैक्षणिक अँप काढले आहेत. एवढेच माही तर त्यांनी या शैक्षणिक अँपची मार्केटिंग ही स्वतःच केली. त्यांनी विविध मार्केटिंग पर्यायापासून आपल्या अँप ला दूर ठेवले. त्यांना हे अँप अशा स्थितीत पोहचायचे आहे की तिथून त्यांचे अँप लोकांनी पैसे देऊन वापरले पाहिजे.

किती कमाई आहे दोन भावांची?

कुमारन भाऊ एखाद्या कंपनीला चालवणारे सर्वात कमी वयाचे डायरेक्टर आहेत. सध्या त्यांचे वय श्रवण 16 आणि संजय 14 वर्षे आहे आणि दोघे भाऊ फिक्की फ्रेम्स 2016 च्या संमेलनाचे सर्वात कमी वय असणारे पैनेलचे सदस्य सुद्धा बनले आहेत. कुमारन बंधूंचे मुख्य इन्कम सोर्स हे त्यांच्या ऍप्स मधील जाहिरातीतून होते. प्रत्येक क्लिक ने त्यांना 0.07 डॉलर ची कमाई होते. त्यांच्या सर्व अँपचा रेव्हेन्यू जोडला तर महिन्याला ते करोडो रुपये कमावतात. एवढेच नाही तर त्यांच्या कंपनीबरोबर चीन, यूएस, आणि भारतीय कंपन्यांनी करार सुद्धा केले आहेत. एवढ्या कमी वयात कमी असलेल्या संसाधनांशिवाय कुमारन भावांनी आपल्या दमावर हे यश मिळवले आहे. ते आता एक मोठे उद्योगपती म्हणून ओळखले जातात.

कुमारन भावांच्या या यशासाठी खासरेकडून अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा…
मराठी फेसबुकचे काही चेहरे, छंदाला बनविला व्यवसाय घरबसल्या कमवतात लाखो…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *