एका आदिवासी जमातीतील महिलेच्या धैर्य आणि दृढ संकल्पाची प्रेरणादायी गोष्ट…

आधुनिक भारतात ज्या महिलांनी आपले उच्च स्थान मिळविले आहे. त्यांनी आपल्या कार्याने समाजात एक उत्कृष्ट उदाहरण दिलेले आहे. पुरुषापेक्षाही अधिक चांगल कार्य या महिलांनी केले हे सांगणे अतिशयोक्ती नाही आहे. याच साखळीत समाजातील भ्रष्टाचार दूर करण्या करिता दृढ संकल्प करून आपले कार्य करणाऱ्या डीएम बी. चंद्रकला यांची प्रेरणादायक गोष्ट आपण खासरेवर बघूया..

फेसबुकवर यांच्या फोटोला कमीत कमी ५० ते ९० हजार लाईक घेणाऱ्या बुलंदशहरच्या डीएम बी. चंद्रकला यांनी आपल्या कठोर परिश्रमाने २००८ साली सिविल सेवा परीक्षेमध्ये यश मिळविले होते. तेलंगणा येथील करीम नगर जिल्ह्यातील गरजानापल्ली नावाच्या छोट्याश्या खेड्यात एका आदिवासी कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. २००८ साली झालेल्या UPSC मध्ये त्यांनी पूर्ण भारतातून ४०९वा क्रमांक मिळविला होता. भ्रष्ट अधिकाऱ्या विरोधात त्यांनी केलेल्या कार्यवाहीची चर्चा संपूर्ण भारतात आहे.

पदवी घेण्याकरिता बी चंद्रकला यांनी कोटी महिला विद्यालयात प्रवेश घेतला. पदवीच्या दुसर्यावर्षीच त्यांचा विवाह झाला परंतु त्यांनी आपल्या शिक्षणाची जिद्द सोडली नाही. मुक्त विद्यापीठातून त्यांनी एम.ए. अर्थशास्त्राची पदवी घेतली आणि पतीच्या मदतीने UPSCची तयारी चालू केली. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आंध्र प्रदेश लोकसेवा आयोग (APPSC) परीक्षेत त्या राज्यातून पहिल्या आल्या. या यशामुळे त्यांना IAS होण्याकरिता अधिक बळ मिळाले. आपल्या चौथ्या प्रयत्नात त्यांनी UPSC परीक्षा पास केली.

एप्रिल २०१२ मध्ये त्यांची पहिली नियुक्ती हमीरपुर येथे डीएम म्हणून झाली त्यानंतर ८ एप्रिल २०१४ ला मथुरा येथे त्यांची नियुक्ती करण्यात आली. इथे त्यांनी फक्त १२९ दिवस काम केले त्यानंतर बी. चंद्रकला यांची बदली बुलंदशहर येथे करण्यात आली. बुलंदशहराच्या इतिहासात आजपर्यंत सर्वात प्रामाणिक अधिकारी म्हणून बी. चंद्रकला यांचे नाव घेण्यात येते. चंद्रकला यांनी वीज वितरण, राजस्व विभाग, तहसील सर्व नगर पालिका येथील भ्रष्टाचाराच्या विरोधात मोर्चा तयार केला आहे. आज तर अशी परिस्थिती आहे भ्रष्ट अधिकारी चंद्रकला यांच्या समोर जाण्यास थरथर कापतात. ठेकेदारांना भीती असते कि त्यांच्या कामावर कधीही चंद्रकला भेट देऊ शकतात.

आपल्या माहितीसाठी मागील काही महिन्या अगोदर चंद्रकला यांची मेरठ येथे बदली झाली आहे आता त्यांना केंद्र सरकारमध्ये पेयजल विभागात उपसचिव बनविण्यात आले आहे. चंद्रकला यांचे भ्रष्टाचारा विरोधात असलेले किस्से सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात वायरल झाले आहे. त्यांची हि गोष्ट अनेक महिलांना प्रेरणादायक आहे.

हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
सर्वात कमी वयात मुख्यमंत्री कार्यालयाचा भार सांभाळणाऱ्या महिला IAS अधिकारी…
अभिनेत्रींना ही लाजवेल असे सौंदर्य असणाऱ्या १० महिला IAS-IPS अधिकारी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *