कमरेला रोज बेल्ट बांधताय, या चुका ठरू शकतात आरोग्यासाठी घातक…

बरेच वेळा आपण अशा अनेक चुका करत असतो ज्या आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. अशीच एक नेहमी घडणारी चूक म्हणजे टाईट बेल्ट बांधणे. फॅशनच्या नावाखाली लोकं असे अनेक वेगवेगळे बेल्ट बांधत असतात आणि अनेकवेळा आपण पॅन्ट कमरेवर टिकून राहावी म्हणून टाईट बेल्ट घालत असतो. परंतु तुम्हाला कल्पना आहे का, टाईट बेल्ट बांधल्याने तुंही तुमच्या आरोग्यासोबत किती मोठी चूक करताय आणि अनेक समस्यांना निमंत्रण देत आहात. आणि ही गोष्ट अशीच बोलली जात नाहीये, पण नुकतेच काही दिवसांपूर्वी केलेल्या एका शोधात ही गोष्ट समोर आली आहे. आणि आज आपण खासरेवर जाणून घेणार आहोत की टाईट बेल्ट बांधल्याने भविष्यात कोणत्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

खरंतर रोज टाईट बेल्ट घातल्याने आरोग्याला अनेक प्रकारे नुकसान सहन करावे लागते. आरोग्य विशेषज्ञांच म्हणणं आहे की बेल्ट बांधणे टाळा आणि बेल्ट बांधणे गरजेचे असेल तर हलका आणि ढिला बेल्ट बांधा. टाईट बेल्ट बांधल्याने तुमच्या पोटातील मांसपेशीवर दबाव पडतो आणि यामुळे पेलविक रिजन मधील आर्टरी, वेल्स, मसल्स आणि आतड्यावर दाब पडतो. रिसर्च मध्ये पण काही तथ्य समोर आले आहेत.

काय सांगतात रिसर्च?

नुकतेच काही दिवसांपूर्वी कोरिया मध्ये एका आरोग्य सर्वेत एक अनेव गोष्टी समोर आल्या आहेत त्यात कमरेवर अधिक टाईट बेल्ट बांधल्याने आपल्या मांसपेशीवर अधिक दबाव पडतो आणि तुमच्या मसल्सचे काम करण्याची पद्धत बदलते. आणि यामुळे शरीरात खूप समस्या उद्भवतात जसे की…

1. शोधामध्ये समोर आले आहे की टाईट बेल्ट बांधल्याने कमरेच्या हाडात समस्या येऊ शकतात. यामुळें तुमच्या उठण्या बसण्याच्या पद्धतीवर विपरीत परिमाण होतो.

2. जास्त वेळ टाईट बेल्ट बांधून ठेवल्याने घोटे आणि जोड्यांमध्ये अधिक ताण पडतो. यामुळे व्यक्तीला जॉईंट पेणच्या समस्या होऊ शकतात.

3. पोटावर घट्ट बेल्ट बांधल्याने आपल्या पचन क्रियेवर प्रभाव पडू शकतो. आणि यामुळे ऍसिडिटी आणि कब्ज सारख्या समस्या होऊ शकतात .

4. या सर्व नुकसानाबरोबर याचा पुरुषांच्या फर्टिलिटी वर शविपरीत परिणाम होतो। कारण यामुळे स्पर्म काऊंटसुद्धा कमी होऊ शकतो.

तसेच एका दुसऱ्या शोधात काही असेच तथ्य समोर आले आहेत. स्कॉटिश शोधानुसार जे लोकं टाईट बेल्ट घालतात त्यांना गळ्याच्या कॅन्सरची समस्या उद्भवण्यासाजी जास्त शक्यता असते. शोधकर्त्याना कळलं की लोकं बेल्ट हा फक्त टाईट करण्यासाठी घालतात. ते ऍसिड रिफलक्स च्या समस्येचा सामना करावा लागू शकतो. आणि पोटातील या असिडमुळे ऍसिड ऑस्फिगल ग्रंथींना प्रभावित करते. यामुळे कँसरचा धोका जास्त असतो.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
सिगारेट ओढता? मग फुफुसाला स्वच्छ ठेवण्यासाठी करा हा घरगुती उपाय…
९० टक्के लोकांना माहिती नाहीत पेरू खाण्याचे हे फायदे, वाचून आश्चर्यचकित व्हाल…
कारमध्ये एसी वापरताना घ्या हि खबरदारी होऊ शकतात अनेक आजार…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *