१ रुपयाच्या नोटीविषयी काही माहिती नसलेल्या गोष्टी नक्की वाचा…

आजपासून ठीक १०० वर्षापूर्वी एक रुपयाची नोट व्यवहारात चलनात आली. ३० नोव्हेंबर १९१७ मध्ये ब्रिटीश राजवटीत एक रुपयाची नोट चलणात आली. पहिल्या विश्व युद्धात एक रुपयाचा शिक्का चलनात आला जो चांदीचा होता परंतु युद्ध सुरु असल्याने चांदीचे शिक्के बनविणे महाग होत होते त्यामुळे १९१७ साली चांदीच्या शिक्क्याची जागा नोटीने घेतली. ठीक १०० वर्षापूर्वी चलनात आलेल्या नोतीव्र इंग्लंडचा राजा जॉर्ज पंचम याचा फोटो होता आज आपण खासरे वर काही रुपया विषयी अपरिचित माहिती बघूया…

भारतीय रिजर्व बँकेच्या माहितीनुसार नोटीची छपाई पहिल्या वेळेस १९२६ साली बंद करण्यात आली होती कारण खर्च अधिक लागत होता. त्यानंतर १९४० मध्ये परत हि नोट छपाई सुरु करण्यात आली जी १९९४ पर्यंत सुरु होती. २०१५साली परत हि छपाई सुरु करण्यात आली.
१. या नोटेची विशेषतः हि आहे कि हि नोट भारतीय रिजर्व बँक छापत नसून भारत सरकार द्वारा या नोटीची छपाई करण्यात येते.
२. या नोटीवर भारतीय रिजर्व बँकच्या गवर्नरची स्वाक्षरी नसून भारताच्या वित्त सचिवाची स्वाक्षरी आहे.
३. नियमानुसार हि एक वास्तविक मुद्रा आहे (करन्सी नोट) बाकी नोट फक्त धारिय नोट(प्रोमिसरी नोट) आहेत ज्यामध्ये धारक फक्त तेवढी राशी देण्याचे वचन दिल्या जाते.
४. पहिले एक रुपयाच्या नोतीव्र ब्रिटीश सरकारच्या तीन वित्त सचिवाची स्वाक्षरी केल्या जात असे ज्यांची नावे एमएमएस गुब्बे, एसी मॅकवाटर्स आणि एच. डेनिंठ हि होती.

५. स्वातंत्र्यापासून आत्तापर्यंत एकूण १८ वित्त सचिवांची या नोटीवर स्वाक्षरी घेण्यात आली आहे.
६. या १०० वर्षात आत्तापर्यंत १ रुपयाच्या नोटीची डिझाईन २८ वेळा बदल करण्यात आला आहे.
७. ३० नोवेंबर १९१७ साली पहिल्या वेळेस जेव्हा पहिल्या वेळेस १ रुपयाची नोट चलनात आली त्यावर “I Promise to Pay” हे शब्द लिहण्यात आले होते.
८. १९४९ साली एक रुपयाच्या नोटीवरील राजा जॉर्ज पंचम याचा फोटो काढून अशोक चिन्हास स्थान देण्यात आले.
९. फक्त एक रुपयाची नोट अशी आहे जी भारत सरकार द्वारा चलनात आणल्या जाते बाकी सर्व नोट रिजर्व बँक ऑफ इंडिया चलनात आणतात.
१०. एक रुपयाच्या नोटीवर भारतीय रिजर्व बँकच्या गवर्नरची स्वाक्षरी नसून वित्त सचिवाची स्वाक्षरी आहे.

माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका..
वाचा या 12 देशांशी तुलना केल्यानंतर तुम्हाला नाही वाटणार भारतीय रुपयाची किंमत कमी.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *