9 वी नापास मुलाने भंगारातून बनवले कॉम्पुटर, गरिबांना स्वस्तात देऊ इच्छितो कॉम्पुटर…

प्रत्येक माणसांमध्ये काही ना काही खास विशेषतः असते. प्रतिभावंत व्यक्तींची प्रतिभा कोणत्या ना कोणत्या मार्गाने ती जगासमोर येत असते. आणि विशेष म्हणजे तुम्हाला काही मोठे किंवा आगळं वेगळं काही करायचं असेल तर त्यासाठी चांगले शिक्षण किंवा एखाद्या चांगल्या विश्वविद्यालयातुन डिग्री मिळवणे सुद्धा महत्वाचे नाहीये. आपल्यामध्ये असे अनेक सफल लोकं आहेत ज्यांनी आपले शिक्षण सोडून आपल्या कौशल्याने पुढे जायचं ठरवलं किंवा शिक्षण अर्ध्यावर सोडून काही तरी नवीन कारनामे केले. एवढेच नाही तर या सुचिमध्ये अनेक खूप कमी वयाचे मुलं आहेत ज्यांनी दाखवून दिले आहे की यश मिळवण्यासाठी किंवा काही तरी नवीन आणि अनोखे करण्यासाठी वयाचे काहीच नसते. आज आपण खासरेवर अशाच एका छोट्या मुलाची माहिती घेऊन आलो आहोत ज्याने भंगारातून कॉम्पुटर बनवून पूर्ण जगाला अचंबित केलं आहे. 9 वीच्या वर्गात नापास झालेल्या या मुलाने कचऱ्यातून मिळालेल्या सामानापासून 9 इंच चे खूप चांगले कॉम्पुटर बनवले आहे आणि त्याचे स्वप्न आहे की येणाऱ्या काळात प्रत्येक गरजवंत आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी स्वस्तात हे कॉम्प्युटर उपलब्ध करून घ्यावे.

कोण आहे हा मुलगा आणि कसा बनवला हा कॉम्पुटर?

मुंबईमधील घाटकोपर मध्ये एका भंगार विक्रेत्याच्या घरात जन्मलेल्या जयंत परब या तरुणाने आज अनेक तरुणांसाठी एक आदर्श घडवून तो प्रेरणास्रोत बनला आहे. जयंतने खूप कमी वयात कॉम्प्युटर बनवून सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला आहे. खरंतर जयंतला लहानपणी पासुनच शिक्षणात विशेष काही रस नव्हता. तो नेहमी त्यांच्या भंगाराच्या दुकानात खेळत असे. त्यामुळे जयंत नववीत नापास सुद्धा झाला. त्याचे वडील रविंद्र शाळा आणि कॉलेजमधून भंगार जमा करत असत. भंगारातील काही सामान रवींद्र विकत असत तर काही सामान रिसायकल करायचे. रवींद्र यांनी सांगितले की जयंतने अगोदर एक लॅपटॉप दुरुस्त केले होते. तेव्हापासून तो कॉम्प्युटर कडे जास्त आकर्षित झाला आणि दिवसरात्र काम करत असे. जयंतच्या वडिलांनी सुद्धा त्याच्यावर विशेष असा दबाव न टाकता त्याच्या इच्छेप्रमाणे पुढे जाऊ दिले. यानंतर तट जयंत पूर्ण दिवस-दिवसभर आपल्या रुममधे बसायचा आणि भंगरातून काही कामाच्या वस्तू जमा करून त्याने कॉम्पुटर बनवण्यास सुरुवात केली. खूप दिवसाच्या अथक परिश्रमानंतर जयंत कॉम्पुटर बनवण्यात यशस्वी झाला. हा कॉम्प्युटर रुग्णालयातील ऑपरेशन कक्षात असणाऱ्या कॉम्पुटरसोबत बिलकुल मिळता जुळता आहे. जयंत सांगतो की त्याचे वडील शाळा-कॉलेजमधून जे भंगार घेऊन येतात त्यात खूप हार्डवेअर असतात ज्यामध्ये काही कॉम्पुटरचे पण परत असतात. जयंतने याच पार्टपासून हे कॉम्पुटर बनवले आहे.

जयंतचे स्वप्न आहे की येणाऱ्या काळात यो मोठ्या प्रमाणात कॉम्पुटर बनवेल, ज्यामुळे देशातील गरीब गरजवंत याचा फायदा उठवू शकतील. भविष्यात चांगले काही करता यावे यासाठी जयंत ने दहावीच्या वर्गात सेंट तेरेसा स्कुलमध्ये प्रवेश घेतला आहे. सोबतच तो हॅकिंगचा कोर्ससुद्धा करत आहे.

जयंतच्या या कामगिरीसाठी खासरेकडून अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
नासाने लाँच केले १८ वर्षीय भारतीय तरुणाने बनवलेले जगातील सर्वात छोटे सॅटेलाइट

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *